Radhakrishna-Vikhe-patil.jpg Sakal
अहिल्यानगर

मोदींची ओळख कणखर नेता म्हणून : आमदार विखे पाटील

सतिश वैजापूरकर


शिर्डी (जि. अहमदनगर) : जनतेचा प्रचंड पाठिंबा, प्रभावशाली व कणखर नेता, अशी जगभर ओळख व देशाला वैभव प्राप्त करून देण्यासाठी आयुष्य समर्पित करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा निर्माण झाली आहे. जगभरातील लोकप्रिय नेत्यांत त्यांचे स्थान वरचे आहे, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.


मोदी यांच्‍या वाढदिवसाचे औचित्‍य साधून, भाजपतर्फे सेवा सप्ताहाचा प्रारंभ विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री अण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, भाजपचे उत्तर नगर जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्‍यक्ष शिवाजी गोंदकर, उपनगराध्‍यक्ष हरिश्‍चंद्र कोते, शिर्डीचे माजी नगराध्‍यक्ष कैलास कोते, डॉ. राजेंद्र पिपाडा, गणेश कारखान्‍याचे अध्यक्ष मुकुंद सदाफळ, राहात्याचे माजी नगराध्यक्ष डॉ. के. वाय. गाडेकर, कैलास सदाफळ, साहेबराव निधाने, नितीन कापसे, डॉ. गोकुळ घोगरे व डॉ. स्वाती म्हस्के आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी लोणी बुद्रुक, राहाता ग्रामीण रुग्‍णालय, शिर्डी येथील साईबाबा रुग्‍णालय व प्रवरा ग्रामीण रुग्‍णालयातील रुग्‍णांना फळांचे वाटप करण्यात आले. शिर्डी येथील सुपर स्‍पेशालिटी रुग्‍णालयात भारतीय जनता युवा मोर्चाच्‍या वतीने रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्‍यात आले. शिबिराचा प्रारंभ विखे पाटील यांच्या हस्ते झाला. ते म्हणाले, या सेवा व समर्पण सप्ताहानिमित्त केंद्र सरकारच्‍या विविध योजनांचा लाभ मिळालेल्‍या लाभार्थींना सन्मानपत्र दिले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT