पोलिसांच्या जाळ्यात esakal
अहिल्यानगर

अहमदनगर : गावठी पिस्तूल विकणारा पोलिसांच्या जाळ्यात

गावठी पिस्तूल विकण्यासाठी आलेल्या औरंगाबादच्या आरोपीस नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने नगर-औरंगाबाद महामार्गावर पांढरीपूल घाट (इमामपूर, ता. नगर) शिवारात अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : गावठी पिस्तूल विकण्यासाठी आलेल्या औरंगाबादच्या आरोपीस नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने नगर-औरंगाबाद महामार्गावर पांढरीपूल घाट (इमामपूर, ता. नगर) शिवारात अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि दोन जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले आहेत. नगर-औरंगाबाद महामार्गावर पांढरीपूल घाटात एक जण गावठी पिस्तूल विकण्यासाठी येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सोमनाथ दिवटे आणि गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पांढरीपुलाजवळील हॉटेल लेमन ट्री जवळ दबा धरून बसले. या ठिकाणी संशयित व्यक्‍ती आल्यावर त्यास पोलिस पथकाने आपली ओळख सांगून पंचासमक्ष अंगझडती घेतली. त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि दोन जीवंत काडतुसे असा 30 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला.

त्याने आपले नाव सागर महेंद्र त्रिभुवन (वय 20, रा. वडगाव कोल्हाटी, ता. जि. औरंगाबाद) असे सांगितले. पोलिस हेड विजयकुमार बाळासाहेब वेठेकर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर त्रिभुवन याच्याविरुद्ध औरंगाबाद जिल्ह्यातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात जबर दुखापतीचा एक गुन्हा दाखल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT