MP Sujay Vikhe Patil  esakal
अहिल्यानगर

…तर प्रश्‍न पंतप्रधानांकडे न्यायचा का? खासदार सुजय विखेंचा सवाल

गौरव साळुंके

श्रीरामपूर (जि. नगर) : विकासकामांच्या प्रारंभासाठी येथील लोकप्रतिनिधी संबंधित खात्यातील मंत्र्यांना निमंत्रित करतात. मात्र, त्यांच्याकडून शेती महामंडळाच्या आकारी पडीत जमिनीचा प्रश्न सुटत नाही. त्यामुळे आता आकारी पडीत जमिनीचा प्रश्‍न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे घेऊन जायचा का, असा सवाल खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे.


तालुक्यातील मुठेवाडगाव येथे एका कार्यक्रमात ते कार्यकर्त्यांशी बोलत होते. याप्रसंगी माजी सभापती दीपक पटारे, उपसभापती नितीन भागडे, बबन मुठे, गिरिधर आसने, गणेश मुदगुले व डॉ. शंकर मुठे उपस्थित होते. खासदार डॉ. विखे म्हणाले, की (कै.) बाळासाहेब विखे पाटील यांनी नेहमी पक्ष व सत्ताविरहित राजकारण केले. त्यांनी विखे कुटुंबावर प्रेम करणारी एकनिष्ठ माणसं निर्माण केली. त्यांच्या पाठबळावर आम्ही आज यशस्वी वाटचाल करीत असून, त्यापैकीच मुठे कुटुंबीय आहेत.


अतिराजकारणामुळे श्रीरामपूर तालुक्याची ही अवस्था झाली आहे. अकोले-पैठण महामार्ग झाल्याशिवाय श्रीरामपूरच्या विकासाला चालना मिळणार नाही. श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय होण्याच्या प्रतीक्षेत अनेक तरुण कार्यकर्ते वृद्ध झाले. म्हणून आता वेळ व परिस्थितीनुसार पुढाऱ्यांनी बदलणे गरजेचे आहे. आमच्या विरोधात बोलणाऱ्यांनीदेखील कधी तरी विखे पाटलांची मदत घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काही नेते घेऊन जाणारे

आरटीओ कार्यालय संगमनेरला हलविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पटारे यांनी सांगितले. त्यावर खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, की कार्यकर्त्यांनी नेत्यांमधील फरक समजून घ्यावा. काही नेतेमंडळी आपल्या तालुक्यात घेऊन जाण्यासाठी येतात. मात्र, आम्ही काही तरी देऊन जाण्यासाठी येतो. हे कार्यालय इतरत्र हलवले, तर त्याविरोधात लढा देणार असल्याचे खासदार डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

Pimpri News : फुगेवाडीत सलग मृत्यूंनी खळबळ; हातभट्टी दारूची चर्चा, पोलिसांचा इन्कार

Latest Marathi News Live Update : विद्युत शॉक लागून होतकरू तरुणाचा मृत्यू; खानापुरातील घटना

Property Card Maharashtra : महापालिका क्षेत्रातील 7/12 उतारे बंद; मिळकतपत्रिका देण्याचा निर्णय, शहरातील जमिनींसाठी 'प्रॉपर्टी कार्ड' व्यवस्था लागू

चीनने पाठ फिरवली, तेव्हा भारताने वाचवले प्राण; आफ्रिकेत भारतीय औषधांचा डंका आणि 'आरोग्यदूत' प्रतिमा!

SCROLL FOR NEXT