Two and a half acres of sugarcane have been burnt due to a short circuit at Pratappur.jpg
Two and a half acres of sugarcane have been burnt due to a short circuit at Pratappur.jpg 
अहमदनगर

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने अडीच एकर ऊस जळाला

आनंद गायकवाड

संगमनेर (नगर) :  उसाच्या क्षेत्रावरुन गेलेल्या वीजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाला. यामुळे अडीच एकर क्षेत्र जळाल्याने, शेतकऱ्याचे सुमारे सात लाख रुपयांची नुकसान झाल्याची घटना प्रतापपूर शिवारात मंगळवारी ( ता. 06 ) दुपारी एकच्या सुमारास घडली.

प्रतापपूर येथील पांडूरंग भिकाजी आंधळे यांचे आश्वी बुद्रूक ते प्रतापपूर शिवेवर गट क्रमांक 508 मध्ये अडीच एकर उसाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रात तोडणीला आलेला ऊस होता. शेतातील विंधन विहीरीवरील विजपंपासाठी शेतावरुन विजवाहक तारा ओढण्यात आल्या आहेत. मंगळवारी दुपारी या तारांमध्ये झालेल्या घर्षणामुळे ठिणग्या पडून लागलेली आग चांगलीच भडकली. 

ही घटना पाहून परिसरातील शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर तसेच ऊस तोडून जाळपट्टे तयार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पद्मश्री विखे पाटील कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या बंबाने घटनास्थळी धाव घेवून आग विझवली. या घटनेत पांडुरंग आंधळे यांचे सुमारे सात लाखांचे नुकसान झाले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : गोवंडीत मिहीर कोटेचा यांच्या प्रचारात दगडफेक

SCROLL FOR NEXT