Funds
Funds Images By Sakal
अहमदनगर

कोवीड सेंटरच्या सुविधांसाठी सरसावले प्राथमिक शिक्षक; दोन लाखाचा निधी जमा

सकाऴ वृत्तसेवा

शेवगाव (अहमदनगर) : कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे शेवगाव येथे प्रशासनाने सुरु केलेल्या कोवीड सेंटरमध्ये सुविधा पुरवण्यासाठी निधीची कमतरता लक्षात घेवून तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून तब्बल दोन लाखाचा निधी जमा केला आहे. अवघ्या दोन दिवसात राबवलेल्या या अभियानामुळे कोवीड सेंटर मुलभूत वैदयकीय सुविधा निर्माण करता येणार आहेत. तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी राबवलेल्या या उपक्रमामुळे संपूर्ण जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांमध्ये वेगळा संदेश गेला आहे.

कोरोना संसर्गाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने तालुक्यातील बाधीत रुग्णांना नगर व इतर शहरात उपचारासाठी जावे लागू नये व तेथील गंभीर परिस्थिती रुग्णांची हेळसांड होवू नये, या दृष्टीने तालुका प्रशासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृह येथे ७५ व त्रिमुर्ती शैक्षणिक संकुलात १५० बेडचे कोवीड सेंटर सुरु केले आहे. मात्र तेथे मुलभूत व आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करण्यासाठी मोठया प्रमाणावर निधीची अडचण असल्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींना मदतीसाठी तहसिलदार अर्चना पागिरे, गटविकास अधिकारी महेश डोके व नोडल अधिकारी शैलजा राऊळ यांनी आवाहन केले होते.

त्यानुसार गेल्या दोन दिवसापासून या सेंटरमधील सुविधांसाठी विविध क्षेत्रातील व्यक्ती, समाजिक कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत. मात्र तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी त्यात आघाडी घेत सोशल मीडियातील एका ग्रुपच्या माध्यमातून दोन दिवसात १७० शिक्षकांनी प्रत्येकी एक, दोन व पाच हजाराच्या प्रमाणात रक्कम जमा करत जवळपास दोन लाखाचा निधी जमा केला आहे. तालुक्यात ७५० प्राथमिक शिक्षक असून आणखी चार पाच दिवस प्रत्येक केंद्राच्या ग्रुपच्या माध्यमातून स्वेच्छेने निधी गोळा करण्यात येणार असल्याने त्यामाध्यमातून शासकीय कोवीड सेंटरसाठी मोठया प्रमाणावर निधी संकलनाचा त्यांचा संकल्प आहे.

तालुक्यातील सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनीही वेगवेगळ्या माध्यमातून पुढाकार घेत ७० हजाराची रक्कम जमा केली आहे. त्यात भक्ती नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष राहुल मालुसरे यांनी स्वत:च्या मुलीच्या वाढदिवसाचा खर्च टाळून २१ हजार रुपये, व्यंकटेश उदयोग समुहाचे अनिल गुंजाळ यांनी ११ हजार रुपये, जनशक्ती मंचचे शहराध्यक्ष सुनिल काकडे यांनी ११ हजार रुपये, कुलदीप फडके यांनी ११ हजार रुपये, सचिन लांडे, अतुल लांडे, प्रविण भारस्कर यांनी प्रत्येकी ५ हजार रुपये अशी सुमारे ७० हजार रुपयांची रक्कम बुधवारी (ता.१४) रोजी सकाळी गटविकास अधिकारी महेश डोके व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी यांच्याकडे सुपूर्द केली.

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे सध्या आरोग्य सुविधा अत्यावश्यक गरज बनली आहे. खाजगी व शहरातील रुग्णालयात उपचार मिळणे कठीण होत असताना शेवगाव तालुक्यातील रुग्णांसाठी बेडची संख्या व सुविधा वाढवण्याची गरज उत्पन्न होणार आहे. त्या दृष्टीने शिक्षकांनी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी आहे. तालुक्यातील दानशुर व्यक्तींनीही विविध स्वरुपातील मदतीसाठी पुढे यावे.
- शैलजा राऊळ, नोडल अधिकारी, कोवीड सेंटर, शेवगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT