21 health centers proposal will approve in winter session nagpur 2023 akola
21 health centers proposal will approve in winter session nagpur 2023 akola  Sakal
अकोला

Akola News : २१ आरोग्य उपकेंद्र मंजुरीचा प्रस्ताव धूळखात; हिवाळी अधिवेशनात तरी प्रश्न मार्गी लागेल काय?

सुगत खाडे

Akola News: ग्रामीण भागातील नागरिकांना गावाजवळच दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी यासाठी शासनामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात ३१ प्राथमिक आरोग्य केंद्र व १७८ उपकेंद्र कार्यरत आहेत.

परंतु गावांची वाढलेली लोकसंख्या व अंतर यामुळे जिल्ह्यात २१ नवे आरोग्य उपकेंद्र व एक प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुरीसाठी तब्बल दोन वर्षाआधी शासनाकडे पाठवण्यात आलेला प्रस्ताव धूळखात पडून आहे. लालफितशाहीच्या या फटक्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची मात्र गैरसोय होत असल्याचे वास्तव आहे.

‘सर्वासाठी आरोग्य’ हे उद्दिष्ट समोर ठेवून ते साध्य करण्याची बांधिलकी राज्य शसनाने स्वीकारली आहे. त्यासाठी गत काही वर्षांपासून प्रतिबंधक, प्रवर्तक, उपचारात्मक आणि पुनर्वसनात्मक आरोग्य सेवा जनतेला पुरविणेकरीता आरोग्य विषयक सुविधांचे जाळे उभारणेसाठी राज्य शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये ग्रामीण जनतेला आरोग्य विषयक सुविधा पोहचविणेसाठी ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे यांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच अलिकडे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गंत विविध कार्यक्रम, क्षयरोग नियंत्रण,

कुष्ठरोग निर्मुलन इत्यादी कार्यक्रमांवर भर दिला जात आहे. गॅस्ट्रो, हिवताप व पाण्यामुळे होणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. रुग्णांना या आरोग्य विषयक सुविधा मिळत असल्या तरी सदर सुविधा मिळवण्यासाठी रुग्णांना अडचणींना सामोरे जेवे लागत असल्याचे वास्तव आहे.

दरम्यान ग्रामीण भागातील वाढलेली लोकसंख्या व अंतर अधिक असल्याने जिल्ह्यात एक प्राथमिक आरोग्य केंद्र व २१ आरोग्य उपकेंद्र निर्मितीचा प्रस्ताव जि.प.च्या आरोग्य विभागाने शासनाकडे ८ एप्रिल २०२१ रोजी पाठवला होता.

सदर प्रस्ताव जवळपास दोन वर्ष शासनाकडे पडून होता. याबाबत पाठपुरावा केल्यानंतर शासनाकडे ६ जानेवारी २०२३ रोजी त्रृटींची पूर्तता केलेला प्रस्ताव सादर करण्यात आला. परंतु या प्रस्तावाला अद्याप शासनाने मंजुरी न दिल्याने ग्रामीण भागातील रुग्णांची आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी फरफट होत आहे.

‘पीएचसी’च्या मंजुरीला सुद्धा दिरंगाई

जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथे सन् २०११च्या जनगणनेच्या आधारावर नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएचसी) प्रस्तावित करण्यात आले आहे. या ठिकाणी केंद्र मंजुरीसाठी १६ डिसेंबर २०२० रोजी

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव सुद्धा मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर सदर प्रस्ताव २२ डिसेंबर २०२० रोजी जिल्हा नियोजन समितीकडे व शासनाला सादर करण्यात आला. परंतु सदर पीएचसीला अद्याप मंजुरी न मिळाल्याने रुग्णांना मात्र त्याचा फटका बसत आहे.

मंजुरीची प्रतीक्षा असलेले आरोग्य उपकेंद्र (तालुकानिहाय)

  • अकोट - शिवपूर, खिरकुंड, मोहाळा, अडगाव खु.

  • पातूर - जिरायत पातूर, चिंचखेड, मलकापूर, भंडारज बु., आलेगाव २, नवेगाव, शेकापूर, सुकळी, गावंडगाव, झरंडी.

  • बाळापूर - वाडेगाव ३

  • तेल्हारा - दिवानझरी

  • मूर्तिजापूर - माना, पोही, नागोली, खापरवाडा.

  • बार्शीटाकळी - विझोरा

गावांची वाढलेली लोकसंख्या व इतर निकषांमुळे जिल्ह्यात २१ नवे आरोग्य उपकेंद्र व एक प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुरीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सदर प्रस्तावाला मंजुरी मिळावी यासाठी सतत पाठपुरावा सुरु आहे. कार्यरत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या माध्यमातून रुग्णांना दर्जेदार सुविधा पुरविण्यावर सतत भर देण्यात येत आहे.

- डॉ. बळीराम गाढवे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. अकोला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT