Winter Session 2023 : अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अवतरले छत्रपती शिवाजी महाराज! विधानभवनावर सफाई कर्मचाऱ्यांच्या मोर्चाची धडक

सरकारवर संताप व आक्रोश; शासन निर्णयाअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना घर देण्यात यावे
1st day of winter session 3 morcha of workers covid warriors congress politics nagpur
1st day of winter session 3 morcha of workers covid warriors congress politics nagpuresakal

Winter Session 2023 : विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तीन मोर्चांनी विधानभवनावर धडक दिली. सफाई कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन भारतीय युवक काँग्रेसने काढलेला विशाल मोर्चा लक्ष वेधक ठरला.

त्याचबरोबर समग्र शिक्षा करार कर्मचारी संघटना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचच्या मोर्च्याने नारेबाजी करून आपल्या मागण्या रेटून धरल्या. शहीद कोरोना योद्धांच्या कुटुंबीयांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत ५० लाख रुपये सानुग्रह मदत मिळावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी भारतीय युवक काँग्रेस आणि अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसने मोर्चा काढला.

यशवंत स्टेडीयम येथून काढण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व माजी नगरसेवक बंटी शेळके, गोविंद परमार, विक्की बढेल, स्वप्नील ढोके, संजय राजशेवती, घनश्याम डकहा, बबलू गंगाहेड, ओमप्रकाश बेहत यांनी केले.

1st day of winter session 3 morcha of workers covid warriors congress politics nagpur
Maharashtra Assembly Winter Session : मच्छी, मटण, शेविंग ब्लेड अन् बॉडीस्प्रे, आमदारांच्या मागण्या आणि चार हजार कोटींची उलाढाल

मोर्चात शेकडो महिला पुरुष सफाई कामगार सहभागी होते. प्रत्येकाच्या हाती झाडू होता. झाडूने रस्त्याची स्वच्छता करीत मोर्चा सीताबर्डीत दुपारी ३.३० वाजता पोहोचला. मोर्चात भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि संत गाडगे बाबा यांच्या वेशभूषेत आलेले युवक युवती लक्ष वेधून घेत होते.

मोर्चा निघण्यापूर्वी महापुरुषांच्या वेशभूषेतील युवकांना बसण्यासाठी घोडे आणण्यात आले होते. मात्र, परवानगी न मिळाल्याने घोडे परत पाठविण्यात आले.

1st day of winter session 3 morcha of workers covid warriors congress politics nagpur
Winter Session 2023 : पहिल्याच दिवशी खडाजंगी; अंबादास दानवेंच्या टीकेला फडणवीसांचे उत्तर

हे सफाई कर्मचारी नसून लक्ष्मी आहे, त्यामुळे या लक्ष्मीचा सन्मान करा अशी आग्रही मागणी माजी नगरसेवक बंटी शेळके यांनी केली. प्रचंड नारेबाजी करीत प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेतले. शिष्टमंडळाने संबंधित मंत्र्याची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.

प्रमुख मागण्या

  • लाड समितीच्या शिफारशीनुसार अनुकंपातत्वावर ३० दिवसात नोकरी मिळावी

  • ऐवजदार कामगारांसाठी २० वर्षांची अट रद्द करावी

  • सर्व ऐवजदार कामगारांना नियमित करण्यात यावे

  • शासन निर्णयाअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना घर देण्यात यावे,

  • कोरोना काळात शहीद झालेल्या कुटुंबातील सदस्यांना अनुकंपातत्वावर नोकरी देण्यात यावी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com