Radhakrishna Vikhe Patil press conference
Radhakrishna Vikhe Patil press conference 
अकोला

Akola : पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे त्वरित भरू; राधाकृष्ण विखे पाटील

सकाळ वृत्तसेवा

अकोला : राज्यभरात सध्या जनावरांमध्ये लम्पी या विषाणूजन्य चर्म रोगाचा प्रादूर्भाव वाढत असून, तो रोखण्यासाठी शासनाद्वारे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. या समस्येचे उच्चाटन करण्यासोबतच पशुधन विकासाच्या दृष्टीने निरंतर सेवा दिली जावी याकरिता, पशुसंवर्धन विभागातील मनुष्यबळाचा अभाव दूर करणेही अत्यावश्‍यक आहे. त्यादृष्टीने लवकरात लवकर विभागातील रिक्त पदे भरण्यात येतील, अशी ग्वाही महसूल, दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी (ता.८) अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेतून दिली.

येथील पशुसंवर्धन विभागाच्या आढावा बैठकीनंतर ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांना संबोधित केले. यावेळी त्यांच्या समवेत आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिष पिंपळे, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार आदी उपस्थित होते.

लम्पी चर्मरोग या जनावरांमधील आजाराचा फैलाव रोखण्यात पशुसंवर्धन विभागाला यश आले आहे असे प्रथमदर्शनी वाटत असले तरी, शासन सतर्क असून जनावरांचे लसीकरण करण्यास शासन प्राधान्य देत आहे. सद्य स्थितीत जिल्ह्यातील सातही तालुक्यात प्रादूर्भाव आढळून आला असून, प्रतिबंधात्मक उपाययोजनेसह आवश्‍यक उपचार सुद्धा देण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने युद्धपातळीवर लसीकरण केले जात आहे. आवश्‍यक लसींचा पुरवठा आज शासनाकडून करण्यात आला असून, लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासन व पशुसंवर्धन विभागाला देण्यात आल्या आहेत. या आजारात जनावरे दगावण्याचे प्रमाण नगण्य असले तरी जनावर दगावल्यास पशुपालकास मदत देण्याबाबतची बाब मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपण मांडू, असे आश्वासनही त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना दिले.

पशुधन पर्यवेक्षक पदभरती लवकरच

जवळपास १८ वर्षांपासून जिल्ह्यासह राज्यभरात पशुधन पर्यवेक्षक पदभरती रखडलेली असून, मध्यंतरी तीन वेळा पशुधन पर्यवेक्षक पदभरतीची जाहिरात काढून अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, एकदाही प्रत्यक्ष पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पशुधन पर्यवेक्षकांची पदे रिक्त आहेत. या विषयाला सुद्धा हात घालत, लवकरच पशुधन पर्यवेक्षक पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

खासगी पशुवैद्यकांची मदत घ्या

राज्यात पशुवैद्यकांची रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तथापि तातडीची स्थिती पाहता खाजगी पशुवैद्यकांची लसीकरणासाठी पशुसंवर्धन विभागाने मदत घ्यावी. त्यासंदर्भात तत्काळ खासगी पशुवैद्यकांसोबत बैठक घेण्याचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील पशुविज्ञान विद्यापीठे व त्यांच्या प्रयोगशाळा यांनी शासकीय प्रयोगशाळांशी समन्वय राखत संशोधनात्मक काम करावे, असेही सूचित केल्याचे ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT