Accused Govardhan Haramkar
Accused Govardhan Haramkar sakal
अकोला

Akola Crime : अकोटच्या पीएसआय सह 3 पोलीस कर्मचाऱ्यांवर खुनाचे गुन्हे दाखल!

सकाळ वृत्तसेवा

अकोला - पोलिसांच्या मारहाणीत झालेल्या एका संशयित आरोपीच्या मृत्यू प्रकरणात अकोट शहर पोलिस स्टेशनच्या एका पोलीस निरीक्षक आणि 3 पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध अकोट पोलिसांत भादवी कलम 302, 34 नूसार विविध कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकाळ माध्यम समूहाने या महत्वाच्या विषयाकडे आज दि. 16 एप्रिल रोजी लक्ष वेधले होते.

दरम्यान सद्यस्थितीत दोघेही जण ताब्यात असून पुढील तपास आयपीएस गोकुळराज करीत आहे. 'गोवर्धन हरमकार' या संशयित आरोपीचा मृत्यू झाला होता. त्याला पोलिसांकडून अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. त्याच्या पार्श्वभागात दांडा टाकून अमानुषपणे कृत्य घडलं होत. मारहाणीत त्याच्या छातीची हाडं तुटलीत. त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याला एका ऑटो रिक्षा चालकाला बोलावत खाजगी रुग्णालयात दाखल केलं.

मात्र उपचारादरम्यान त्याचा दुसऱ्याच दिवशी दुर्दैवी मृत्यू झाला. एवढ्या गंभीर प्रकरणात अकोला पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती. अखेर कुटुंबियांनं विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यलय गाठलं. अन् चौकशी समिती बसली. या प्रकरणात मृतकाच्या वैद्यकीय अहवालानुसार खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे सर पोलीस कॉन्स्टेबल चंद्रप्रकाश सोळंके या दोघांनाही ताब्यात घेतल. विशेष म्हणजे विधान परिषदचे उपसभापती नीलम गोर्हे यांनी याप्रकरणी दखल घेतली असून अकोला पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत.

नेमकं कुटुंबियांनी काय म्हटल तक्रारीत?

मृत गोवर्धन यांचे काका सुखदेव हरमकार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, एका गुह्याच्या आरोपाखाली अकोट शहर पोलिसांतील पीएसआय राजेश जवरे' आणि इतर 3 पोलीस कर्मचाऱ्यांनी 15 जानेवारी रोजी पूतण्या गोवर्धन याला अटक केली. त्यानंतर 16 जानेवारीला सुकळी गावात आणत घर झड़ती घेतली. पुढ, पोलिसांनी गोवर्धनसह तक्रारदार सुखदेव यांनाही ताब्यात घेतलं.

16 जानेवारीला रात्री आठ ते नऊ वाजता दोघांनाही पोलीस ठाण्यात आणण्यात आलंय. इथं दोघांनाही अमानुषपणे मारहाण सुरू झाली. या मारहाणीत सुखदेव हरमकार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल केलंय. गंभीर अवस्था झालेल्या गोवर्धनला बाहेरील 'आकाश' नामक व्यक्तीच्या मदतीनं पोलिसांनी खाजगी रुग्णालयात दाखल केलंय.

आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 जानेवारीला गोवर्धनचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. गोवर्धनच्या प्राथमिक एक्स-रे आणि मेडिकल कागदपत्राद्वारे दिसून आले की त्याच्या छातीची हाडं तूटली होती, असा आरोपही नातेवाईकांनी आपल्या तक्रारीत केलाय.

शवविच्छेदनात वैद्यकीय अहवालात धक्कादायक खुलासे

गोवर्धन याच्या मृत्यूप्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसात मर्ग दाखल करण्यात आला होता, आता त्यात खुनाच्या गुह्यातील कलम वाढवण्यात आले. मात्र वैद्यकीय प्राथमिक अहवालात गोवर्धन याच्या अंगावर मोठ्या प्रमाणात जखमा आढळून आल्या. अशी माहिती आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांनी सकाळ माध्यम समूहाला दिली होती.

या प्रश्नांच्या उत्तर पोलिस शोधतील का?

मृत गोवर्धनला कोणत्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं? नेमकं पोलिस ठाण्यात काय घडलं?, पोलिसांकडून कुटुंबियांना वैद्यकीय अहवाल द्यायला टाळाटाळ का केली जातंय?, कुटुंबियांना धमक्या देणारे 'ते' व्यक्ती कोण? या सर्व प्रश्नांची उत्तरे अकोला पोलीसांनी देण्याची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: शिवानी अग्रवालला उद्या कोर्टात हजर केले जाणार

IND vs PAK: 'पाकिस्तानला सुरुवातीचे पंच तोच मारेल...', भारताविरुद्ध सामन्यापूर्वी माजी कर्णधाराचा आपल्याच संघाला इशारा

100 वर्ष जुनं पुस्तक खरेदी करण्यासाठी उद्योगपती गेला खाजगी विमानाने; कोणतं आहे ते पुस्तक?

Chhaya Kadam : रेड कार्पेटवर 'ते' मराठी गाणं वाजलं अन् मी डान्स करायला सुरुवात केली; छाया कदम यांनी सांगितले 'कान'चे खास किस्से

Amravati Loksabha Election : अमरावतीत मतविभाजनाचा लाभ कुणाला?

SCROLL FOR NEXT