Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateEsakal

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी साधारणतः 59.45% मतदान

राज्यनिहाय झालेलं मतदान टक्केवारी

बिहार 50.79%

चंडीगढ़ 62.80%

हिमाचल प्रदेश 67.67%

झारखंड 69.59%

ओडिशा 63.57%

पंजाब 55.86%

उत्तर प्रदेश 55.60%

पश्चिम बंगाल 69.89%

४ जूनला आणखी आकडे बदलणार- मुख्यमंत्री धामी

एक्झिट पोलमधून दिसून येणारे आकडे ४ जून रोजी पुन्हा जास्त वाढणार आहेत. सगळ्याच पोलमधून भाजप आणि एनडीएला बहुमत दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा विजय आहे, असा विश्वास उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी व्यक्त केला.

लोकसभेचा शेवटचा टप्पाही उरकला; 59 टक्के मतदानाची नोंद

लोकसभा निवडणूक २०२४ च्या शेवटच्या सातव्या टप्प्याचही मतदान आता संपलं आहे. या मतदानाची शेवटच्या ६ वाजेपर्यंतची आकडेवारी आता समोर आली आहे. त्यानुसार, शेवटच्या टप्प्यात देशभरात ५९ टक्के मतदान झालं आहे.

क्रिकेटर दिनेश कार्तिकनं जाहीर केली निवृत्ती

भाजपला किती जागा मिळणार? केजरीवालांनी स्पष्ट केली भूमिका

सातव्या टप्प्यातील मतदान संपलं! मतदान केंद्रांवर ईव्हीएम सील करण्याचं काम सुरु

Lok sabha : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.३४% मतदान

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.३४% मतदान

राज्यनिहाय झालेलं मतदान टक्केवारी -

बिहार ४८.६८%

चंडीगढ़ ६२.८०%

हिमाचल प्रदेश ६६.५६%

झारखंड ६७.९५%

ओडिशा ६२.४६%

पंजाब ५५.२०%

उत्तर प्रदेश ५४.००%

पश्चिम बंगाल ६९.८९%

Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंत 49.68% मतदान

राज्यनिहाय झालेलं मतदान टक्केवारी -

बिहार 42.95%

चंडीगढ़ 52.61%

हिमाचल प्रदेश 58.41%

झारखंड 60.14%

ओडिशा 49.77%

पंजाब 46.38%

उत्तर प्रदेश 46.83%

पश्चिम बंगाल 58.46%

Lok Sabha Election: EVM मशीन मध्ये गडबड होऊ नये याची घेतली जाणार काळजी

EVM मशीन मध्ये गडबड होऊ नये याची काळजी घेतली जाणार आहे. निकालादिवशी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मतमोजणी केंद्रावर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येणार नाही त्या जागांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. INDIA आघाडीच्या बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

अरविंद केजरीवाल  तिहार जेलमध्ये करावे लागणार सरेंडर; जामीनाबाबात ५ जूनला निर्णय

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उद्या तिहार जेलमध्ये सरेंडर करावेच लागणार आहे. केजरीवाल यांच्या जामीनाबाबत दिल्ली हायकोर्ट ५ जूनला निर्णय देणार आहे. आज केजरीवाल यांच्या जामीनाबाबत सुनावणी झाली यावेळी कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. केजरीवाल उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत तिहार जेलमध्ये सरेंडर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आङे.

केजरीवालांच्या अंतरीम जामीन याचिकेवर पाच तारखेला निर्णय  

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वैद्यकीय कारणास्तव दाखल केलेल्या अंतरिम जामीन याचिकेवरील निर्णय दिल्ली न्यायालयाने राखून ठेवला आहे. न्यायालयाने या निर्णयासाठी ५ जूनची तारीख निश्चित केली आहे.

४ जूननंतर अजित पवारांशी एकनिष्ठ राहून दाखवावं; शरद पवार गटाची टीका

राष्ट्रवादीच्या प्रवक्ते सूरज चव्हाण यांना १ रुपयाचा चेक देण्यात आला. जयंत पाटील हे काँग्रेसमध्ये जाणार, असं भाकित सूरज चव्हाण यांनी केल होतं. जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या या विधानावरुन शरद पवार गटाकडून सूरज चव्हाण यांना १ रुपयाचा चेक देण्यात आला आहे. मुंबई दक्षिणचे युवक अध्यक्ष संतोष पवार यांनी सूरज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली य सूरज चव्हाण यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल भाकित केलं... जयंत पाटील हे शरद पवारांचे एकनिष्ठ असे नेते आहेत, सूरज चव्हाण यांनी ४ जूननंतर अजित पवारांशी एकनिष्ठ राहून दाखवावं असंही पवार यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून पी सी चाको यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून पी सी चाको यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

डी गुकेश विरुद्ध चीनचा डिंग लिरेन! 'या' शहरात होऊ शकते जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप मॅच

चेन्नई, सिंगापूर आणि दिल्ली यांनी डी गुकेश आणि चीनचा डिंग लिरेन यांच्यातील जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप सामन्याचे आयोजन करण्यासाठी बोली सादर केली आहे, अशी माहिती FIDE कडून देण्यात आली आहे. त्यामुळे या तीन शहरात ही मॅच आयोजित केली जाऊ शकतो.

Pune Accident: शिवानी अग्रवालला उद्या कोर्टात हजर केले जाणार

कल्याणीनगर अपघाताप्रकरणी अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिला आज ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलीस तिला उद्या कोर्टात हजर करतील.

Pune Accident: कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपीने पोलिसांना उत्तरं दिले नाहीत-सूत्र

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपीने पोलिसांना काहीही उत्तर दिले नसल्याची माहिती आहे. साम टीव्हीच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

Ayushmann Khurrana: अभिनेता आयुष्मान खुराणानं बजावला मतदानाचा हक्क

अभिनेता आयुष्मान खुराणानं मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान केल्यानंतर तो म्हणाला, "मी मतदान करण्यासाठी आणि माझा हक्क बजावण्यासाठी माझ्या शहरात परत आलो...मुंबईत यावेळी खूपच कमी मतदान झाले पण आपण मतदान केले पाहिजे... जर आपण मतदान केले नाही तर आपल्याला तक्रार करण्याचा अधिकार नाही. ..."

Lok Sabha Election 2024 Phase 7 Voting: बंगालमध्ये वाद पेटला, TMC-ISF समर्थकांमध्ये हाणामारी, भाजपचा आरोप- पराभवाच्या भीतीने हिंसाचार

लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार झाला आहे. जाधवपूर मतदारसंघातील भंगारमध्ये तृणमूल काँग्रेस आणि आयएसएफच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. पोलिस घटनास्थळी पोहोचताच निदर्शने सुरू झाली आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप केले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या भागातून काही देशी बॉम्बही जप्त करण्यात आले आहेत.

Lok Sabha Election 2024 Phase 7 Voting: 4 जून रोजी इंडिया आघाडी जिंकेल- राज्यसभा खासदार मनोज झा

राज्यसभा खासदार आणि आरजेडी नेते मनोज झा म्हणाले, "लोक सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांवर मतदान करत आहेत. एक्झिट पोल आज संध्याकाळी काहीही सांगत असले तरी, 4 जून रोजी निकाल येतील तेव्हा इंडिया आघाडी जिंकेल.''

Pune Porsche Accident: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

पुण्यातील कार अपघाताबाबत, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "घटना घडल्यानंतर लगेचच चौकशी सुरू करण्यात आली याची गृहमंत्री आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी खात्री केली आहे. या प्रकरणासंदर्भात मी पुणे सीपींना कोणताही फोन केला नाही.

आमचे आमदार सुनील टिंगरे यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली. त्यांना साखरेचे प्रमाण जास्त आहे आणि ते सध्या अस्वस्थ आहेत. त्यामुळेच ते लोकांसमोर न आल्याने मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी मला सांगितले की ते कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी तयार आहेत आणि"

चेन्नई-मुंबई विमानात बॉम्बची धमकी !

Mumbai News : इंडिगो फ्लाइट 6E 5314 चैन्नई-मुंबई विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. यावेळी विमान मुंबईत उतरताच तपासणी सुरू आहे. या आधी प्रवाशांना सुखरूप उतरवण्यात आले.

Mumbai news: 31 जुलैपर्यंत समुद्रातली मासेमारी बंद

आजपासून समुद्रातल्या मासेमारीला ब्रेक लागणार आहे. त्यामुळे 31 जुलैपर्यंत ही मासेमारी बंद असणार आहे. मासे खाणाऱ्या खवय्यांचा हिरमोड होणार आहे.

मंत्री अदिती तटकरेंनी केली पंढरपूर तळघराची पाहणी

महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी पंढरपूर येथे जाऊन तळघराची पाहणी केली.

Maharashtra News : महामेगाब्लॉगच्या दुसरा दिवशी 534 फेऱ्या रद्द

महामेगाब्लॉगच्या दुसरा दिवशी लोकलच्या तब्बल 534 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Himachal Loksabha: हिमाचलमध्ये 9 वाजेपर्यंत सर्वाधिक 14.35 टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीत आज शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरू झाले आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत हिमाचल प्रदेशाता सर्वाधिक 14.35 टक्के मतदान झाले आहे.

Rabari Devi: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू"

आज सकाळपासून लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मदतानाला सुरूवात झाली आहे. बिहारमध्ये मतदान केल्यानंतर माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी ते सर्व 40 जागा जिंकतील असा दावा केला.

Pune Porsche Accident: पोर्शे अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या आईची चौकशी सुरू

पुणे पोर्शे अपघातातील आरोपीच्या आईला आज पुणे पोलिसांनी अटक केली. यानंतर पोलिसांनी आता आरोपीच्या आईची चौकशी सुरू केली आहे.

Archana Patil: राष्ट्रवादीच्या लोकसभा उमेदवार अर्चना पाटील यांच्यावर गुन्हा

राष्ट्रवादीच्या धाराशीव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अर्चना पाटील यांनी विनापरवाणगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा घेतल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे.

Lalu Yadav: लालू यादव यांनी पत्नी आणि मुलीसह पाटण्यात केले मतदान

आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि त्यांची मुलगी आणि सारण लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवार रोहिणी आचार्य यांनी पटना येथील मतदान केंद्रावर मतदान केले.

Kangana Ranaut: मतदान सुरू होताच कंगनाचे वडील म्हणाले, प्रत्येकजण कमळाचे बटण दाबणार

हिमाचलच्या मंडीतील भाजप उमेदवार कंगना रणौतचे वडील अमरदीप रणौत यांनी आज सुरू असलेल्या मतदानादरम्यान सांगितले की, खूप छान वाटत आहे. दिवाळीप्रमाणेच सर्वजण मोठ्या उत्साहात येत असून प्रत्येकजण कमळाचे बटण दाबणार आहे. सर्व मतदारांना विनंती आहे की त्यांनी बाहेर पडून भाजपला मतदान करावे.

Yogi Adityanath: मुख्यमंत्री योगी अदित्यनाथांनी केले मतदान

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर येथील गोरखनाथ येथील मतदान केंद्रावर मतदान केले. गोरखपूर जागेवर भाजपचे रवी किशन, सपाच्या काजल निषाद आणि बसपचे जावेद अश्रफ यांच्यात लढत आहे.

PM Modi: "आपली लोकशाही अधिक चैतन्यशील बनवूया," पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

"आज 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा आहे. मला आशा आहे की तरुण आणि महिला मतदार विक्रमी संख्येने त्यांचा मतदानाचा हक्क बजावतील. एकत्र मिळून आपली लोकशाही अधिक चैतन्यशील आणि सहभागी बनवूया," असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

Voting For 7th Phase: आज होणार 904 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला

लोकसभा निवडणुकीचे 2024 चे सहा टप्पे पूर्ण झाले आहेत. आज सातव्या टप्प्यासाठी आठ राज्यांतील 57 जागांवर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे. दरम्यान आज 904 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.

Lok Sabha Election 2024: शेवटच्या टप्प्यात आता सात राज्यात मतदान

Latest Marathi News Live Update : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यात, सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या एकूण 57 जागांसाठी 1 जून रोजी मतदान होत आहे.

4 जून रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात बिहार, चंदीगड, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये मतदान होत आहे.

यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com