Crime
Crime sakal
अकोला

Crime News : माझे तिच्यावर प्रेम आहे.. तू हे लग्न करू नकोस...! भावी पतीला फोन करून मोडले तरुणीचे लग्न

सकाळ वृत्तसेवा

बाळापूर - 'माझे तिच्यावर प्रेम आहे.. तू हे लग्न करू नकोस...' असा तरुणीच्या भावी पतीला फोन कॉल करून लग्न मोडणाऱ्या एका युवकावर बाळापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील कोळासा येथील एका‎ २० वर्षीय तरुणीचा गावातीलच एका‎ तरुणाने एकतर्फी प्रेमातून साक्षगंध झाल्यानंतर तिचे लग्न मोडले आहे. त्यामुळे या प्रकरणी बाळापूर‎ पोलिसांत त्याच्यावर विनयभंगासह‎ विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एकतर्फी प्रेमाचे अनेक परिणाम पाहायला मिळाले आहेत. असाच एक प्रकार बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. कोळासा येथील एका युवतीने पोलिसात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार फिर्यादी तरुणी व आरोपी हा मागील एका वर्षापासून मित्र - मैत्रिण आहेत. त्यामुळे त्या दोघांचे मोबाईलवर बोलणे सुरू होते, चॅटिंग करत होते.

दरम्यान फिर्यादी तरुणीचे साक्षगंध पार पडले. यामुळे आरोपीला चांगलाच धक्का बसला. मैत्रीचा वेगळाच अर्थ काढत आरोपीने सदर युवती कॉलेजमध्ये जात असताना तीला गाठले व 'माझे तुझ्यावर प्रेम आहे तू माझ्यासोबत लग्न कर' असे म्हणून तिचा हात धरुन तिचा विनयभंग केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नसून मी तुझे लग्न होऊ देणार नाही, आणि तुझ्या आई वडिलांना मारून टाकेन, अशी धमकी दिली.

त्यानंतर आरोपीने तिच्या होणाऱ्या पतीशी संपर्क साधून 'आमचे एकमेकांवर प्रेम आहे' हे लग्न करू नका असे सांगितले. त्यामुळे तिचे भावी संसाराचे स्वप्न उदध्वस्त झाले. त्यानंतर तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी आज रविवारी आरोपी विश्वजीत विनोद वानखडे याच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT