Denied entry for wearing hijab in NEET exam Parents complaint to police washim  SAKAL
अकोला

नीट परीक्षेत हिजाब घातल्याने प्रवेश नाकारला; पालकांची पोलिसात तक्रार

वाशिम येथील मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय केंद्रावर मुस्लिम विद्यार्थिनींना चेहरा व हॉल टिकिट दाखविल्या नंतर ही हिजाब व बुरखा काढण्यास लावला

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : काल (ता. १७) जुलै रोजी नीटच्या परीक्षेदरम्यान मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब व बुरखा घातल्याने त्यांना परिक्षा केंद्रावर प्रवेश नाकारल्याची घटना घडली. या प्रकरणी पालकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वाशिम येथील मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय केंद्रावर मुस्लिम विद्यार्थिनींना चेहरा व हॉल टिकिट दाखविल्या नंतर ही हिजाब व बुरखा काढण्यास लावला असा आरोप मुस्लिम विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांनी केला आहे.या प्रकरणी वाशिम पोलीसांत तक्रार देण्यात आली आहे.

पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत असे नमूद आहे की, मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयात नीट चा पेपर घेण्यात आला होता, मात्र या विद्यार्थ्यांसह इरम मोहम्मद जाकीर व अरिबा समन गझनफर हुसैन यांच्या सोबत केंद्रातील प्रशासकीय अधिकारी व सदस्यांशी गैरवर्तन केले व ते म्हणाले. बुरखा काढा नाही तर कात्रीने कापावं लागेल.एवढंच नव्हे तर भर रसत्यात हिजाब व बुरखा काढायला लावला गेलं असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आलं आहे.

पीडित विद्यार्थिनीने सांगितले की, आधी परीक्षा कक्षात येण्यास मज्जाव करण्यात आला, नंतर हिजाब आणि बुरखा काढून टाका असे सांगून बाहेर पाठवण्यात आले, बराच वादावादी झाल्यानंतर शेवटी रस्त्यावर बुरखा आणि हिजाब काढण्यात आला. परीक्षा कक्षात ही उपस्थित शिक्षकाचा वर्तन योग्य नसल्याचेही पीडित विद्यार्थिनीने म्हटले आहे.

या प्रकरणी वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार प्राप्त झाली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी ठानेदार रफीक शेख हे करत आहे. चौकशी अंति योग्य ती कारवाई केली जाणार आहे.

- सुनील कुमार पुजारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, वाशीम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EC on Rahul Gandhi: शपथपत्रावर सही करा किंवा निरर्थक आरोपांसाठी देशाची माफी मागा... निवडणूक आयोग आक्रमक! राहूल गांधीचेही खोचक उत्तर

गायत्रीचं रहस्य, राहुलचा पर्दाफाश आणि सायलीचा भूतकाळ उलगडणार; मालिकांच्या महासंगमच्या प्रोमोने प्रेक्षक SHOCK !

Kolhapur Crime : बहिणीने आईवरून अपशब्द वापरला म्हणून भावाचा गळा चिरला, जयसिंगपूर पोलिसांना तपासात धक्कादायक माहिती उघड

Solapur News: Gopichand Padalkar यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण, Sharad Pawar यांच्या समर्थकावर आरोप | Sakal News

Mangalagaur Celebration: पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा! नागपुरात रंगताहेत मंगळागौरीचे खेळ

SCROLL FOR NEXT