frustrated farmers at msedcl office demand Uninterrupted power supply balapur akola
frustrated farmers at msedcl office demand Uninterrupted power supply balapur akola Sakal
अकोला

Balapur News : अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी वैतागले; महावितरण कार्यालयावर धडक

सकाळ वृत्तसेवा

बाळापूर : रब्बी हंगामातील पिके व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांपुढे वीज पुरवठ्याचा मोठा प्रश्न भेडसावत आहे. पिके जगविण्याची चिंता असलेल्या शेतकऱ्यांनी ही समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी सोमवारी बाळापूर येथील माहवितरणचे उपकार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक देवून अखंडीत वीज पुरवठा करण्याची मागणी केली.

बाळापूर तालुक्यासह जिल्ह्यात कृषिपंपांसाठी वीज पुरवठ्यामध्ये प्रचंड अनियमितता आहे. फिडरवर अतिरिक्त भार आणि कडक उन्हामुळे रोहित्रावरून वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. कृषी वाहिनीवरील वीज समस्येमुळे पाणी असूनही वेळेत सिंचन न करता येत असल्याने पिके सुकू लागली आहेत. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

अशा शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. १३ रोजी) विज वितरण कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. देगाव, मानकी, कान्हेरी गवळी, व्याळा, खिरपुरी बु., खिरपुरी खुर्द, नांदखेड, टाकळी इत्यादी गावांना व्याळा वीज उपकेंद्रातून विजेचा पुरवठा होतो. त्यामुळे येथील शेती फिडरवर अतिरिक्त भार येत असल्यामुळे वारंवार वीज खंडित होत आहे.

याबाबत वारंवार कळविण्यात आले. मात्र, महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याचे काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसत आहे. पाण्यामुळे पिके सुकत आहे. याला वीज वितरण जवाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांना महावीतरणचे आश्वासन

बाळापूर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर शेतकऱ्यांनी नारेबाजी करत ठिय्या दिला. दरम्यान, उपकार्यकारी अभियंता शेगावकर यांनी वरीष्ठ अधिकारी अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्याशी शेतकऱ्यांचे बोलणे करून देत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

व्याळा फिडरवरील भार कमी करणार असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. चर्चेनंतर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. मात्र, दोन दिवसात समस्या न सोडविल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी महावीतरणला दिला आहे.

व्याळा फिडर वरील भार अत्यंत वाढल्यामुळे फिडरवरील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. प्रत्येक दिवशी हा विद्युत पुरवठा खंडित होत असून, सद्या रब्बी हंगामा असल्यामुळे शेतकऱ्यांचे शेती पंप चालण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे व वारंवार होणाऱ्या खंडीत विद्युत पुरवठ्या मुळे शेती पंप तसेच विद्युत मोटार जळण्याचा मोठा धोका निर्माण होत आहे.

या बाबत वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देऊन ही याची कोणतीही दखल घेण्यात येत नाही. तरी याकडे महावितरण कंपनीने लक्ष देऊन या फिडर वरील वारंवार खंडीत होणारा विद्युत पुरवठा थांबवावा अन्यथा मोठे आंदोलन उभे करू.

- शिवाजीराव मैसने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT