Sindkhed Raja News
Sindkhed Raja News sakal
अकोला

Sindkhed Raja News : मातृतीर्थ सिंदखेड राजा विकास आराखड्याला मिळणार चालना; डॉ राजेंद्र शिंगणे

गजानन काळुसे

सिंदखेड राजा : मातृतीर्थ सिंदखेड राजा शहराच्या विकास आराखड्या संदर्भात तारीख १० जुलै रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहावर महत्वाची बैठक झाली असून या बैठकीत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शहर विकास आराखडा तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या, सदर बैठक आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर आश्वासन पूर्ती साठी घेण्यात आली आहे.

सह्याद्री अतिथगृहावर आलेल्या या महत्वपूर्ण बैठकीला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह आमदार डॉ राजेंद्र शिंगणे,राज्य पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्ग,भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अधिकारी, तहसीलदार सचिन जैस्वाल,नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर,अभियंता सतीश वाकडे, नगररचनाचे अनिकेत इंगोले यांच्यासह अन्य सहा विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

तारीख १० जुलै रोजी दुपारी ३ वाजता झालेल्या या बैठकीत मातृतीर्थ सिंदखेड राजा विकास आराखड्यावर चर्चा झाली.मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा विषय तत्काळ मार्गी लागला पाहिजे या विषयी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या अखत्यारीत शहरातील ४ महत्वाच्या वास्तू आहेत तर उर्वरित ९वास्तू या राज्य पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहेत.

या सर्व वास्तूनचे जतन,संवर्धन व्हावे या उद्देशाने मागील काळात १६८ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता सदर आराखड्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली असून आहे त्याच आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात लक्ष घालण्याच्या सूचना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत.शहरातील विविध कामे त्यात्या विभागाने सादर करायची असे असले तरीही नगर परिषदेने या सहा विभागांचा एकत्रित विकास आराखडा देण्याचे या पूर्वीच ठरले आहे.त्यानुसार नगर परिषदेने सार्वजनिक बांधकाम विभाग

,क्रीडा विभाग,पोलीस, वन विभाग,महसूल व स्वतः नगर परिषदेने आपला एकत्रित ३८२ कोटी रुपयांचा आराखडा सादर केला असून त्यात विविध कामे प्रस्तावित आहेत.या आराखड्याला या बैठकीत मान्यता देण्यात आली असली तरीही जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात लक्ष घालून प्रक्रिया पुर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा पुढाकार

सिंदखेड राजा शहर विकास आराखडा मार्गी लागावा यासाठी आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी मागील उन्हाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली होती.सध्या राजकीय समीकरणे बदलली आहेत,

राज्य सरकार देखील विकास विषयक बाबींकडे गांभीर्याने पाहत असल्याने हा विषय आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी योग्यवेळी उपस्थित करून या विषयाला चालना दिली आहे.दरम्यान सोमवारी झालेल्या बैठकीत अत्यंत गांभीर्याने चर्चा झाली असून हा विषय येत्या पावसाळी अधिवेशनात मार्गी लागण्याचे संकेत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT