Science Park at Maharashtra Secondary School akola
Science Park at Maharashtra Secondary School akola sakal
अकोला

अकोला : महाराष्ट्र माध्यमिक शाळेत साकारतोय विज्ञान पार्क

सकाळ वृत्तसेवा

अकोला : सर्व विद्यार्थ्यांना विज्ञान डोकेदुखी न वाटता, विज्ञान कळावे. त्यांना विज्ञानाची गोडी लागावी, या हेतूने विदर्भात नागपूर नंतर अकोल्यात महाराष्ट्र माध्यमिक शाळेत विज्ञान पार्क साकारण्यात येत आहे. येत्या काही दिवसात हा विज्ञान पार्क विद्यार्थ्यासाठी खुला केला जाणार आहे. गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय विद्यार्थ्यांना अडचणीचे वाटतात. सूत्र कोण लक्षात ठेवणार, ही खरी अडचण असते. मात्र, विज्ञानाच्या अनेक गमती-जमती आहेत. या गमती-जमती विद्यार्थी पुस्तकातून वाचतात.

मात्र, या गमती-जमती विद्यार्थ्यांना स्वत: अनुभवयास मिळाव्यात तसेच त्यामागील कारणे कळावीत, या हेतुने आयडिअल एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालीत महाराष्ट्र माध्यमिक शाळेतील खुल्या जागेत विज्ञान पार्क साकारण्याचे काम सुरू आहे. विज्ञानाच्या विविध प्रतिकृती येथे लावण्यात येत आहे. बहुतांश प्रतिकृती लावण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप काही प्रतिकृती लावण्याचे काम बाकी आहे. या सर्व प्रतिकृती विद्यार्थ्यांना स्वत: हाताळता येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना हे विज्ञान पार्क खुले राहणार आहे. या विज्ञान पार्कमध्ये संगीतमय नळ्या, स्थिरता तपासा, केंद्रोत्सवी बळ, समांतर की वर्तुळाकार, डोळ्याची फसगत, स्वत:ला उचला, अँटी ग्रॅव्हिटी कोन आदी विविध १६ ते २० प्रतिकृती येथे लावण्यात येणार आहेत. येत्या काही दिवसात हा विज्ञान पार्क विद्यार्थ्यासाठी खुला होत आहे. या विज्ञान पार्कसाठी शाळेतील मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला आहे.

अकोल्यात पहिल्यांदाच

यापूर्वी अशा प्रकारचा विज्ञान पार्क पाहण्यासाठी नागपूर, पुणे, हैद्राबाद येथेच विद्यार्थ्यांना जावे लागत होते. मात्र, आता ही सुविधा अकोल्यातच उपलब्ध होत आहे, असा दावा करून विज्ञान पार्कचे काही काम राहिलेले आहे. हे काम येत्या काही दिवसात पूर्ण होईल. विज्ञान दिनाच्या दिवशीच पार्क सुरू करण्याचा आमचा मानस होता. मात्र, काही बाबी राहिल्या आहेत. परंतु, येत्या काही दिवसात हा विज्ञान पार्क सुरू करण्यात येईल, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक आनंद साधु यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT