Puinjab-National-Bank
Puinjab-National-Bank 
अर्थविश्व

गैरव्यवहाराएवढेच आणखी नुकसान

पीटीआय

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर शेअर बाजारामध्ये बॅंकेच्या समभागात मागील पाच सत्रांत झालेल्या घसरणीमुळे बॅंकेचे बाजारमूल्य १०९ अब्ज रुपयांनी कमी झाले आहे. बॅंकेतील गैरव्यवहार ११३ अब्ज रुपयांचा असून, जवळपास एवढेच नुकसान आता बॅंकेचे झाले आहे. 

बुधवारपासून ‘पीएनबी’च्या समभागात सुरू असलेली घसरण आज सलग पाचव्या सत्रातही कायम राहिली. आज बॅंकेच्या समभागात ५ टक्के घसरण होऊन तो १११ रुपये या वर्षभरातील नीचांकी पातळीवर होता. मागील आठवड्यात शेअर बाजारामध्ये ‘पीएनबी’च्या समभागात २८ टक्के घसरण झाली. ‘पीएनबी’चे बाजारमूल्य आतापर्यंत १०९ अब्ज रुपयांनी कमी होऊन २८२ अब्ज रुपयांवर आले आहे. ‘पीएनबी’चे बाजारमूल्य १२ फेब्रुवारीला ३९२ अब्ज रुपये होते. 

‘पीएनबी’मध्ये सरकारचा हिस्सा ५७.०४ टक्के असून, समभागात झालेल्या घसरणीमुळे सरकारला ६२.७४ अब्ज रुपयांचा फटका बसला आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) ‘पीएनबी’मध्ये १३.९३ टक्के हिस्सा असून, ‘एलआयसी’ला १५.३२ अब्ज रुपयांचा फटका बसला आहे.

पतमानांकन घटवण्याचा इशारा 
‘मूडीज’ आणि ‘फिज रेटिंग्ज’ या पतमानांकन संस्थांनी ‘पीएनबी’चे पतमानांकन घसरवण्याचा इशारा आज दिला. बॅंकेच्या एकूण मालमत्तेत झालेली घसरण आणि बॅंकेच्या तोट्यात होत असलेली वाढ यामुळे हा इशारा देण्यात आला आहे. 

बाजारमूल्य - ३९२ 
१२ फेब्रुवारी - २८२ 
२० फेब्रुवारी - १०९
पाच सत्रांत घसरण
आकडे अब्ज रुपयांत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT