Rotomac-Group
Rotomac-Group 
अर्थविश्व

‘रोटोमॅक’ची बॅंक खाती ‘प्राप्तिकर’ने गोठवली

पीटीआय

नवी दिल्ली - रोटोमॅक समूह आणि त्याच्या प्रवर्तकांची ११ बॅंक खाती प्राप्तिकर विभागाने गोठवली आहेत. ही सर्व खाती उत्तर प्रदेशमधील विविध बॅंकांमधील आहेत. 

रोटोमॅक समूहाने ३ हजार ६९५ कोटी रुपयांचा कर्ज गैरव्यवहार केल्याचा आरोप असून, याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग, सक्त वसुली संचलनालय (ईडी) आणि प्राप्तिकर विभागाकडून सुरू आहे. रोटोमॅकने ८५ कोटी रुपयांचा कर भरलेला नसल्याने ११ बॅंक खाती गोठविण्याचे पाऊल प्राप्तिकर विभागाने उचलले आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात समूहाची तीन बॅंक खाती गोठविण्यात आली होती. 

बॅंक ऑफ बडोदाने दिलेल्या तक्रारीनुसार, ‘सीबीआय’ने रोटोमॅकचा संचालक विक्रम कोठारी, त्याची पत्नी साधना आणि मुलगा राहुल; तसेच बॅंकेच्या अज्ञात अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोटोमॅकने बॅंकांकडून ३ हजार ६९५ कोटी रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. यामध्या मूळ कर्जाची रक्कम ३ हजार ९१९ कोटी रुपये आहे. कालच याप्रकरणी ‘सीबीआय’ने रोटोमॅक समूहावर छापे घातले होते.

‘ईडी’कडूनही गुन्हा दाखल 
‘ईडी’नेही रोटोमॅकविरुद्ध करचुकवेगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बॅंकांकडून कर्ज घेऊन बेकायदा मालमत्ता आणि काळ्या पैशाची निर्मिती करण्यात आल्याचा ‘ईडी’ला संशय आहे. या प्रकरणांमधे बॅंकांची भूमिकाही तपासण्यात येत आहे.

कोठारीची आजही चौकशी 
रोटोमॅक समूहाचे संचालक विक्रम कोठारी यांची आज सलग दुसऱ्या दिवशी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चौकशी केली. कालच कोठारी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलाला ‘सीबीआय’ने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

रोटोमॅक कर्ज गैरव्यवहार 
एकूण बॅंका :     सात 
मूळ कर्ज :     २ हजार ९१९ कोटी रुपये 
व्याजासह कर्ज :    ३ हजार ६९५ कोटी रुपये 

कर्ज देणाऱ्या बॅंका 
(आकडे कोटी रुपयांमध्ये) 

बॅंक ऑफ इंडिया :     ७५४.७७ 
बॅंक ऑफ बडोदा :     ४५६.६३ 
इंडियन ओव्हरसीज बॅंक :     ७७१.०७ 
युनियन बॅंक ऑफ इंडिया :     ४५८.९५ 
अलाहाबाद बॅंक :     ३३०.६८ 
बॅंक ऑफ महाराष्ट्र     ४९.८२ 
ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स :     ९७.४७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT