top shares
top shares google
अर्थविश्व

बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?

शिल्पा गुजर

शुक्रवारी बाजारातील सततच्या घसरणीचा ट्रेंड सुरूच होता. सलग सहाव्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीवर बंद झाले. मागच्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी 5 टक्क्यांहून अधिक घसरले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. बँका, रियल्टी, मेटल व्यतिरिक्त सर्व क्षेत्रात विक्री दिसून आली.

शुक्रवारी निफ्टी 67 अंकांनी घसरून 15294 वर बंद झाला. त्याचवेळी सेन्सेक्स 135 अंकांनी घसरून 51360 वर बंद झाला. निफ्टी बँक 125 अंकांनी वाढून 32723 वर बंद झाला. मिडकॅप 303 अंकांनी घसरून 25877 वर बंद झाला आहे. निफ्टीचे 50 पैकी 37 शेअर्स घसरले. सेन्सेक्समधील 30 पैकी 17 शेअर्सची विक्री झाली. निफ्टी बँकेचे 12 पैकी 7 शेअर्स तेजीत होते.

शुक्रवारी बाजाराने 2 वर्षातील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण पाहिली. 3 मे 2020 नंतरची ही सर्वात मोठी साप्ताहिक घट राहिली. मागील आठवड्यात निफ्टी 5.8 टक्के आणि सेन्सेक्स 5.3 टक्क्यांनी तर निफ्टी बँक 5.11 टक्क्यांनी घसरली. तर मिडकॅप 6.2 टक्के आणि स्मॉलकॅप 8 टक्क्यांनी घसरला आहे.

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती ?

यूएस फेड प्रमुखांचे भाषण आणि चीनचा व्याजदराच्या निर्णयावर बाजाराचे लक्ष असेल असे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी सांगितले. देशांतर्गत घटकांबद्दल बोलायचे तर कोविडची वाढती प्रकरणे आणि मान्सूनच्या हालचालींवर बाजार लक्ष असेल.

17 जून रोजी निफ्टीने एक डोजी बनवला जो वरच्या दिशेने (बाऊंस) दाखवत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे दीपक जसानी म्हणाले. एका आठवड्यात 5.6 टक्क्यांच्या घसरणीनंतर हा पॅटर्न तयार झाला आहे. 17 जून म्हणजेच शुक्रवारचा 15,183 चा नीचांक आता खूप महत्त्वाचा सपोर्ट असेल. दुसरीकडे, वरच्या बाजूने 15,335 आणि 15,659 वर रझिस्टंस दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

बजाज फायनान्स (BAJFINANCE)

कोल इंडिया (COALINDIA)

जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

रिलायन्स (RELIANCE)

एमआरएफ (MRF)

भारत इलेक्ट्रीकल लिमिटेड (BEL)

अशोक लेलँड (ASHOKLEY)

टाटा पॉवर (TATAPOWER)

झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic advisory : मुंबईत PM नरेंद्र मोदींची जाहीर सभा; गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Cotton Seeds : पहिल्याच दिवशी कपाशी बियाण्यांचा अत्यल्प पुरवठा; आजपासून कापूस बियाणे विक्रीचा होता मुहूर्त

MS Dhoni: धोनी RCB ला देणार सरप्राईज? CSK ने शेअर केलेल्या त्या व्हिडिओने चर्चांना सुरुवात

Share Market Today: अमेरिकन बाजार विक्रमी उच्चांकावरून कोसळले; भारतीय शेअर बाजारात कशी असेल स्थिती?

Devendra Fadnavis: "सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

SCROLL FOR NEXT