अर्थविश्व

भांडवली बाजार स्थिर 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जागातिक पातळीवरील अनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी (ता.11) भांडवली बाजारात मोठी उलथापालथ दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्‍स 21.47 अंशांच्या वाढीसह 40 हजार 345.08 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत किरकोळ 5.30 अंशांची वाढ झाली आणि तो 11 हजार 913.45 अंशांवर बंद झाला. आज दिवसभरात निर्देशांकाने 266 अंशांची झेप घेतली होती. 

हॉंगकॉंगमधील अस्थिरता, अमेरिका-चीनमधील मधील व्यापारी संघर्ष यामुळे जगभरातील भांडवली बाजारांमध्ये अनिश्‍चिततेचे वातावरण दिसून आले. आशियातील बहुतांश भांडवली बाजारांमध्ये पडझड झाली. मूडीजे भारतीय अर्थव्यवस्थेची मानांकन कमी केल्याने सकाळपासून बाजारावर दबाव दिसून आला. आयटी, एफएमसीजी, एनर्जी, ऑटो, टेक, कॅपिटल गुड्‌स आदी क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली. येस बॅंकेच्या शेअरमध्ये आज मोठी उसळी दिसून आली. येस बॅंकेचा शेअर 5.80 टक्‍क्‍यांनी वधारला. टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बॅंक, इंड्‌सइंड बॅंक, ऍक्‍सिस बॅंक, कोटक बॅंक आणि टाटा स्टील आदी शेअर तेजीसह बंद झाले. हिरो मोटोकॉर्प, वेदांता, टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्‌स, मारुती आणि महिंद्रा अँड महिंद्रा आदी शेअर घसरणीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये आज खरेदी दिसून आली. 

वाहन उत्पादकांची निराशाजनक आकडेवारी, जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांनी भांडवली बाजारातील मूड बदलल्याचे जिओजित फायन्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य विश्‍लेषक विनोद नायर यांनी सांगितले. मंगळवारी (ता.12) चलनवाढीची आकडेवारी जाहीर होणार आहे. त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असेल. किरकोळ बाजारात भाजीपाला, कांदे यासारख्या वस्तूंच्या किंमती वाढल्याने चलनवाढीचा पारा आणखी चढेल, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. 

web title : Capital markets is Stable

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sam Pitroda: पित्रोदांच्या विधानावरुन PM मोदींचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, युती...

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

High Court : ''मुस्लिमांना लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहण्याचा अधिकार नाही'', हायकोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Pankaja Munde Audio: "पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करा"; बजरंग सोनावणेंची निवडणूक आयोगाकडं मागणी

T20 World Cup 2024: भारतात वर्ल्ड कप सामने पाहाता येणार फ्री! पण कोणाला आणि कसे घ्या जाणून

SCROLL FOR NEXT