Gold Rate sakal
अर्थविश्व

Gold-Silver Rate : आज सोन्याच्या दरात झाली वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

गेल्या आठवड्यात सोने चांदीच्या दरात घसरण होती.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या आठवड्यात सोने चांदीच्या दरात घसरण होती. मात्र आज सोन्याच्या दरात वाढ दिसून येत आहे तर चांदीचे दरही वाढले आहेत. (Gold Silver Price)

मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर आज चांदीच्या दरात तेजी आली आहे. चांदीचा दर आज मागील बंद भावापेक्षा 51 रुपयांनी वाढून 69,084 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. चांदीचा दर आज 69,2201 रुपयांवर उघडला आहे.

आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 50,100 तर 24 कॅरेटचा 54,630 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 711 रुपये आहे. (gold silver price update 26 December 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 55,500 रुपये

  • दिल्ली - 54,630 रुपये

  • हैदराबाद - 54,480 रुपये

  • कोलकत्ता - 54,480 रुपये

  • लखनऊ - 54,630 रुपये

  • मुंबई - 54,480 रुपये

  • नागपूर - 54,480 रुपये

  • पुणे - 54,480 रुपये

जागतिक बाजारपेठेत सोने वधारले, चांदी घसरली :

आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत संमिश्र कल पाहायला मिळत आहे. सोन्याची स्पॉट किंमत आज 0.49 टक्क्यांनी वाढून 1,807.31 प्रति औंस डॉलर झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात, चांदीची किंमत आज 0.01 टक्क्यांनी घसरून 23.74 प्रति औंस डॉलरवर व्यवहार करत आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT