sakal-realty
sakal-realty 
अर्थविश्व

‘सकाळ रिॲल्टी’बरोबर व्यवसायाची मोठी संधी

वृत्तसंस्था

आर्थिक सेवा व्यवसाय क्षेत्रात स्थिरावल्यानंतर ‘सकाळ मनी’ने आता ‘रियल इस्टेट अॅडव्हायझरी’ क्षेत्रात ‘सकाळ रिॲल्टी’ नावाने पदार्पण केले आहे. आपल्या स्वप्नातील घर खरेदी करीत असताना होणारी फसवणूक टाळता यावी, यासाठी खरेदीदाराला विश्वासार्ह सल्ल्याची आवश्यकता असते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन ‘सकाळ मनी’ने ‘रेरा’ अधिकृत सल्लागार म्हणून या क्षेत्रात पाऊल टाकले आहे.

कित्येक जण कर्ज काढून घर खरेदी करण्याला प्राधान्य देतात. मात्र, आपण घर खरेदी करत असलेला बांधकाम प्रकल्प ‘महारेरा’कडे नोंदणीकृत आहे का किंवा त्या जागेवर विकसकाने निवासी प्रकल्प राबविण्यास आवश्यक असलेले ‘एनए’ प्रमाणपत्र घेतले आहे किंवा नाही, याची खातरजमा होणे आवश्यक असते. ‘सकाळ रिॲल्टी’मुळे या गोष्टी आता सहजशक्य होणार आहेत. 

पहिल्या टप्प्यात ‘सकाळ मनी’ पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील नामांकित आणि विश्वासार्ह बांधकाम विकसकांशी जोडले जाणार आहे. ‘सकाळ मनी’बरोबर आतापर्यंत आर्थिक सेवा क्षेत्रातील १५०० हून अधिक सल्लागार जोडले गेले आहेत. रियल इस्टेट व्यवसायातील संधी लक्षात घेता बांधकाम व्यावसायिक, प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन एजंट, डीएसए, इंटेरियर डिझायनर, चार्टर्ड अकाउंटंट, रिटायर्ड बँकर; तसेच अनिवासी भारतीयांना (एनआरआय) आर्थिक सेवा देणारे व्यावसायिक, प्रॉपर्टीशी संबंधित कायदेशीर बाबी सांभाळणारे व्यावसायिक आणि अन्य इच्छुकांना ‘सकाळ रिॲल्टी’बरोबर जोडले जाऊन आपला व्यवसाय वाढविण्याची मोठी संधी आहे.

नेमके फायदे काय?
शहरातील आघाडीच्या ३० पेक्षा अधिक विकसकांच्या १०० पेक्षा अधिक प्रकल्पांबरोबर करार. 
‘सकाळ रिॲल्टी पार्टनर्स’ना एकाच छताखाली शहरातील सर्व प्रमुख विकसकांच्या प्रकल्पांचा ‘अॅक्सेस’ मिळणार.  
कमिशन/पेमेंटसाठी विकसकांशी संपर्क साधण्याची आवश्यकता नाही.
प्रत्यक्ष प्रकल्पाच्या ठिकाणी माहिती देण्यासाठी ‘सकाळ मनी’चे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर.  
‘सकाळ रिॲल्टी’ या सुसज्ज पोर्टलच्या माध्यमातून सर्व प्रकल्पांची माहिती एका ‘क्लिक’वर.
जे पार्टनर चांगला व्यवसाय करतील, त्यांना ‘सकाळ मनी’कडून ‘लीड शेअरिंग’.  
या संधीचा लाभ घेण्यासाठी 74474 52339 या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअॅप मेसेज करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT