Post Office investment esakal
अर्थविश्व

पोस्टात पैसे गुंतवलेत! ३१ मार्चपर्यंत करा हे काम

व्याजावर याचा परिणाम होऊ शकतो

सकाळ डिजिटल टीम

भारतात पैसे गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. त्यात अनेक लोकं पोस्ट ऑफिसमधील योजनांमध्ये गुंतवणूक करतात. किंवा त्यामध्ये पैसे गुंतवण्याची योजना करतात. तुम्ही पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांमध्येही गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला हे काम ३१ मार्च किंवा त्यापूर्वी पूर्ण करावे लागेल. अन्यथा, तुमचे व्याजाचे पैसेही अडकू शकतात.

पोस्ट ऑफिसच्या नियमांनुसार, राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न खाते (MIS), ज्येष्ठ नागरिक बचत योजना खाते (SCSS) आणि टाइम डिपॉझिट यांसारख्या लहान बचत योजनांवर त्रैमासिक, मासिक आणि वार्षिक व्याज मिळविण्यासाठी आता बचत खाते असणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे जर कोणी ही खाती लिंक केली नाही तर त्याच्या व्याजावर याचा परिणाम होऊ शकतो. त्या व्यक्तीचे नुकसान होऊ शकते.

पोस्ट विभागाने दिलेल्या आदेशांप्रमाणे , एमआयएस/एससीएसएस/टीडी (MIS/ SCSS/ TD) खात्यांवरील व्याज 1 एप्रिल 2022 पासून खातेधारकाच्या पीओ बचत खात्यात किंवा बँक खात्यात जमा केले जाईल, असे म्हटले आहे. पण, जर खातेदाराने 31 मार्चपूर्वी MIS/SCSS/TD खाती लिंक केली नाहीत, तर व्याजाचे पैसे त्याच्या बँक बचत खाते आणि पोस्ट ऑफिस बचत खात्यात पाठवले जाणार नाहीत. हे पैसे त्याला योजनेतील चेक किंवा क्रेडिटद्वारे दिले जाणार आहेत.

खाते लिंक करणे का गरजेचे?

- जमा केलेल्या व्याजावर बचत खात्यात जास्त व्याज मिळते.

- छोट्या बचत खात्यांमधून व्याजाचे पैसे काढू शकत नाही. पण, खाते लिंक झाल्यावर पैसे लगेच खात्यात जमा होतात.

- खात्यात पैसे जमा झाल्यावर तुम्ही ऑनलाइन पैसे सहज काढू शकता.

- योजनेतून पैसे काढताना अनेक कागदपत्रे जमा करावी लागतात. तसेच फॉर्म भरावा लागतो, त्यामुळे बचत होते.

- यामध्ये क्रेडिटचा पर्यायही निवडला जाऊ शकतो. त्याचा लोकांना फायदा होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Apps Ban India : भारताने 'या' 5 OTT प्लॅटफॉर्मवर घातली बंदी! तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर लगेच करा डिलीट, नाहीतर होईल कारवाई

Ranji Trophy Final मध्ये मोठा राडा! जम्मू-काश्मीरचा कर्णधार कर्नाटकच्या फिल्डरला भिडला, मग मयंक अगरवालही...

३० हजारांची लाच घेतली अन् फसला, उपसंचालकाकडे ४ कोटींची रोकड, कोट्यवधींचं सोन् आणि अनेक ठिकाणी फ्लॅट; ट्रॉली बॅगेत पैसे

Sensitive Teeth Tips: दात संवेदनशील आहेत? गरम किंवा थंड खाल्ल्यावर झिणझिण्या येतात? हे 3 टिप्स आजच फॉलो करा

Mumbai News: मुंबईतील राणीच्या बागेत गुजरातच्या सिंहाची गर्जना होणार; कधी? महत्त्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT