म्युच्युअल फंडांवर गुंतवणूकदारांचा वाढतोय विश्वास!

इक्विटी म्युच्युअल फंडांत फेब्रुवारी 2022 मध्ये 19,705 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
mutual fund
mutual fundesakal
Summary

इक्विटी म्युच्युअल फंडांत फेब्रुवारी 2022 मध्ये 19,705 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

शेअर बाजारात (Share Market) प्रचंड अस्थिरता असतानाही, इक्विटी म्युच्युअल फंडावरील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत चालला आहे. इक्विटी म्युच्युअल फंडांत फेब्रुवारी 2022 मध्ये 19,705 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. तर जानेवारीमध्ये 14,888 कोटी रुपये आणि डिसेंबर 2021 मध्ये 25,077 कोटी रुपये गुंतवणूक दिसून आली. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाने (Amfi)ही आकडेवारी जाहीर केली. मार्च 2021 पासून इक्विटी स्कीम्समध्ये सतत गुंतवणूक होत आहे आणि या काळात या विभागात 1 लाख कोटींहून अधिक इनफ्लो दिसून आला.

mutual fund
म्युच्युअल फंडात महिन्याला पैसे गुंतवणे फायदेशीर की एकरकमी! जाणून घेऊयात

इंडस्‍ट्रीमध्ये 31,533 कोटींचा नेट इनफ्लो

Amfi डेटानुसार, फेब्रुवारीमध्ये म्युच्युअल फंड इंडस्‍ट्रीमध्ये 31,533 कोटी रुपयांची नेट गुंतवणूक झाली. गेल्या महिन्यात उद्योगाची नेट इनफ्लो 35,252 कोटी रुपये होती. इंडस्‍ट्रीच्या ऍसेट अंडर मॅनेजमेंटमध्ये (AUM) किरकोळ घट होऊन ती गेल्या महिन्यात 38.01 लाख कोटी रुपयांवरून जानेवारीच्या अखेरीस 37.56 लाख कोटी रुपयांवर आली.

जुलै 2020 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान इक्विटी म्‍युचअल फंड स्‍कीम्‍समध्ये आउटफ्लो दिसून आला. ज्यामध्ये गुंतवणूकदारांनी इक्विटी योजनांमधून 46,791 कोटी रुपये काढले.

mutual fund
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

फ्लेक्सी-कॅप फंडात जास्त गुंतवणूक

Amfi डेटानुसार, इक्विटी विभागातील सर्व कॅटेगरीत नेट इनफ्लो आहे. पण, फ्लेक्सी-कॅप फंडांमध्ये सर्वाधिक इनफ्लो दिसून आला. फेब्रुवारी 2022 मध्ये फ्लेक्सी-कॅप सेगमेंटमध्ये 3,873 कोटी रुपयांचा नेट इनफ्लो होता. यानंतर, थीमॅटिक कॅटेगरीत 3,441 कोटी रुपयांचा ओघ दिसला.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com