Mahabank
Mahabank 
अर्थविश्व

अखेर महाबॅंक सावरली

सकाळवृत्तसेवा

पुणे - मार्चअखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत बॅंक ऑफ महाराष्ट्रला ७२.३८ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव यांनी चौथ्या तिमाहीअखेरचे आर्थिक निकाल आज जाहीर केले. या वेळी बॅंकेचे कार्यकारी संचालक ए. सी. राऊत आणि कार्यकारी संचालक हेमंत टम्टा उपस्थित होते. 

गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत बॅंकेला ११३.४९ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. मागील आर्थिक वर्षात बॅंकेला ४,७८४ कोटी रुपयांचा तोटा झाला असून, त्याआधीच्या आर्थिक वर्षात तो १,१४६ कोटी रुपये होता. आज जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, चौथ्या तिमाहीत बॅंकेचा कार्यान्वयन नफा ५०१ कोटी असून, गेल्या वर्षी तो ५४७ कोटी रुपये होता. व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नात १३.४७ टक्‍क्‍यांची वाढ झाली असून, याद्वारे बॅंकेला १००० कोटी मिळाले. गेल्या वर्षी हा आकडा ८८१ कोटी रुपये होता. बॅंकेने या तिमाहीत २,३४,११७ कोटींचा व्यवसाय केला असून, त्यात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बॅंकेने ९४,६४५ कोटींच्या कर्जांचे वितरण केले आहे. बॅंकेकडील ठेवीत वाढ झाली असून, ३१ मार्चअखेर बॅंकेकडे १, ४०,६५० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. थकीत कर्जामध्ये ३,१०९ कोटींची घट झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत (१८,४३३ कोटी) चौथ्या तिमाहीअखेर थकीत कर्जांचे प्रमाण १५,३२४ कोटी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT