Nirav-Modi
Nirav-Modi 
अर्थविश्व

नीरव मोदीच्या १४७ कोटींच्या मालमत्तेवर टाच

पीटीआय

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदी याच्या मुंबई व सुरतमधील १४७.७२ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मंगळवारी (ता. २६) टाच आणली. 

ईडीने मनी लॉड्रिंग (पीएमएलए) कायद्याअंतर्गत कारवाई करून जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये आठ कार, सुरतमधील प्रकल्प व यंत्रसामग्री, इमारती, दागिने, महागडी पेटिंग आदीचा समावेश आहे. त्यांचे एकत्रित बाजारमूल्य १४७.७२ कोटी असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. ही मालमत्ता नीरव मोदी व त्याच्या मालकीच्या फायरस्टार डायमंड, राधेशीर ज्वेलरी, रिदम हाऊस या कंपन्यांच्या नावावर आहे. ईडीने यापूर्वी कारवाई करून नीरवच्या देशात व 
विदेशात असलेल्या सुमारे १,७२५.३६ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. शिवाय समूहाकडील ४८९.७५ कोटी रुपयांचे सोने, दागिने, हिरे तसेच इतर ऐवजही जप्त केला होता. 

दरम्यान, हा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर नीरव मोदी भारतातून फरार झाला असून, त्याने ब्रिटनमध्ये आश्रय घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यासह या प्रकरणाशी संबंधित इतर आरोपींच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून प्रयत्न सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

SCROLL FOR NEXT