अर्थविश्व

मेहुल चोक्सीला परत आणण्यासाठी एअर अॅम्ब्युलन्स पाठवू

वृत्तसंस्था

मुंबई: मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी एअर अँब्युलन्स पाठवू असे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)  मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले आहे. शिवाय चोक्सीच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी आणि उपचारासाठी एक वैद्यकीय टीमही देखील पाठविले जाईल असेही सांगण्यात आले.  मेहुल चोक्सीने तब्येतीचे कारण पुढे करत भारतात येण्यास नकार दिला आहे. 

पीएनबीतील गैरव्यवहारप्रकरणी मेहुल चोक्सी प्रमुख आरोपी आहे. मात्र चोक्सीने अॅण्टीग्वामध्ये आसरा घेतला असून मोदी सरकारने भारतात परत आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मेहुल चोक्सीला कोर्टात हजर राहत नसल्याबाबत जाब विचारला होता. त्यावर मी आजारी असून सध्या भारतात येऊ शकत नाही असे न्यायालयाला सांगण्यात आले आहे. 

ईडीने प्रतिज्ञापत्रात सांगतले आहे की,'' आम्ही चोक्सीला आणण्यासाठी  एअर अँब्युलन्स पाठवू. प्रवासादरम्यान आणि भारतात आल्यानंतर त्याची पूर्णपणे काळजी घेतली जाईल. शिवाय मेहुल चोक्सी सध्या ईडीच्या तपासात सहकार्य करत नसून तो भारत पुन्हा न परतण्यासाठी आजारपणाचे कारण पुढे करतो आहे. यावर मात्र चोक्सीने ईडीचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. शिवाय कोणतीही वैद्यकीय चाचणीस सामोरे जाण्यास तयार असून माझी प्रकृती ठीक झाल्यानंतर भारतात न्यायालयात हजर राहीन. 

चोक्सी आणि ईडीदरम्यान आरोप-प्रत्यारोप सुरु असून चोक्सीने दावा केला आहे की, त्याची 6129 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. मात्र, ही माहिती चुकीची असून चौकशीदरम्यान ईडीने केवळ 2100 कोटी रुपयांची संपत्ती केल्याची माहिती न्यायालयाला दिली आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प बॉक्सर अन् टी-शर्टवर आले, निरोध देखील वापरला नाही; पॉर्न स्टारने केले अनेक खुलासे

Air India Express: एअर इंडिया एक्स्प्रेसची 70 उड्डाणे रद्द; 300 कर्मचारी सुट्टीवर, काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : "राजीव गांधी यांच्या काळात राम लल्लाची पूजा सुरू झाल्याचे पंतप्रधान मोदी विसरले"

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT