अर्थविश्व

स्टेट बँकेकडून कर्जदारांसाठी ऑफरचा पाऊस 

वृत्तसंस्था

मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँकेने सणासुदीचा हंगाम बघता कर्जदारांची विविध ऑफर देऊ केल्या आहेत. लहान ग्राहकांसाठी बँकेने कमी व्याजदरात वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज आणि शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले आहे. 

वाहन कर्ज (कार लोन):
 एसबीआयने कार कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ केले आहे. याव्यतिरिक्त कार लोन 8.7 टक्के दराने उपलब्ध करून दिले आहे. जे सध्या इतर बँकांकडून कारसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या तुलनेत सर्वाधिक कमी व्याजदरात उपलब्ध करून दिले आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून म्हणजे योनो ऍपद्वारे कर्जासाठी ऑनलाईन अर्ज केल्यास ग्राहकांना कर्जाच्या दरात आणखी 25 बीपीएसची सवलत देण्यात येणार आहे. पगारदार ग्राहकांना कारच्या ऑन-रोड किंमतीच्या 90 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे. 

वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन): 
बँकेकडून 10.75 टक्के दराने वीस लाख रुपयांपर्यंत 'पर्सनल लोन' देण्यात येणार आहे. ज्याचा परतफेडीचा कालावधी सहा वर्षांचा असेल. शिवाय पगारदार व्यक्तीला योनो प्लॅटफॉर्मद्वारे प्री-ऍप्रूव्ह 5 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. 

 शैक्षणिक कर्ज (एज्युकेशन लोन): 
एसबीआय भारतात शिक्षणासाठी 50 लाख रुपये तर परदेशात शिक्षणासाठी 1.50 कोटी रुपये कर्ज मिळणार आहे. बँकेचे एज्युकेशन लोन 8.25 टक्के दरापासून सुरु होते. शिवाय परतफेडीसाठी 15 वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. 

गृह कर्ज (होम लोन): 
बँकेने जुलैमध्ये रेपो लिंक्ड लेंडिंग रेटची सुरुवात केली असल्याने रिझर्व्ह बँकेने रेपो दर कमी केल्यास ग्राहकांना कमी दरात कर्ज मिळणार आहे. एसबीआयने सर्वात कमी म्हणजे 8.05 टक्के दराने गृहकर्ज उपलब्ध करून दिले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT