अर्थविश्व

बँक खात्यात पैसे नाहीत? काळजी नको! गरजेच्या वेळी SBI कडून मिळतील पैसे, जाणून घ्या कसं…

सकाळवृत्तसेवा

आपल्याला कधीही पैशांची गरज भासू शकते. अशा परिस्थितीत आपत्कालीन निधीसाठी जास्तीत जास्त पर्याय आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. गरज असताना बँकेतील खात्यावरही पैसे नसतात. पण, जर तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल तर काळजी करु नका.... कारण, खात्यावर पैसे नसतानाही तुम्हाला बँकेकडून पैसे मिळू शकतात...ही सुविधा म्हणजे ओव्हरड्राफ्ट.  देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आपल्या कोट्यवधी ग्राहकांना ओव्हरड्राफ्ट (Overdraft Facility) ही खास सुविधा देत आहे. यामध्ये ग्राहक आपल्या खात्यामध्ये पैसे नसतानाही गरजेच्यावेळी पैसे काढू शकतो. 
 
काय आहे ओव्हरड्राफ्ट योजना?
ओव्हरड्राफ्ट म्हणजे एकप्रकारे बँक तुम्हाला मर्यादित कालावधीसाठी कर्ज उपलब्ध करुन देते. ओव्हरड्राफ्टमुळे खात्यात असलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे तुम्ही काढू शकता. बँकेकडूम मिळालेले है पैसे ठरावीक कालावधीत परत करावे लागतात. यावर बँक ठरावीक व्याजही आकारते. ओव्हरड्राफ्टची सुविधा जवळपास सर्वच सरकारी आणि खासगी बँकांमध्ये उपलब्ध आहे. तथापि, बहुतेक बँकांमध्ये ही सुविधा चालू खाते, वेतन खाते किंवा एफडीवर उपलब्ध आहे. 

कसं मिळवाल ओव्हरड्राफ्ट
बँक काही ग्राहकांना प्रीअप्रूव्ड ओव्हरड्राफ्ट पर्याय देतं. तर काहींना यासाठी वेगळी मंजूरी घ्यावी लागते. यासाठी लेखी किंवा ऑनलाइन अर्ज करावा लागतो. काही बँका यासाठी फी आकरतात. दोन प्रकारचे ओव्हरड्राफ्ट असतात. एक सिक्योर्ड आणि दुसरा अनसिक्योर्ड. सिक्योर्ड ओव्हरड्राफ्टमध्ये तुम्हाला बँकामध्ये काहीतरी तारण ठेवावं लागतं. साधरणपणे बँकेमध्ये तारण ठेवत असलेल्या गोष्टींवर आधारित पैसे मिळू शकतील. म्हणजेच तुम्हाला हमी म्हणून बँकेत काहीतरी द्यावे लागेल. जसं.. एफडी, शेअर्स, घर, पगार, विमा पॉलिसी, बॉन्ड्स इत्यादी... जर तुमच्याकडे तारण म्हणून ठेवण्यासाठी काही नसेल तरीही तुम्ही ओव्हरड्राफ्ट घेऊ शकता.  अनसिक्योर्ड ओव्हरड्राफ्ट म्हणतात. याचं उदाहरण म्हणजे क्रेडिट कार्डनं घेवाणदेवाण करणं होय.  

किती असेल लिमिट ?
ओव्हरड्राफ्टद्वारे तुम्हाला किती पैसे मिळू शकतात हे बँक किंवा  NBFCs ठरवेल. 

हा मिळणार फायदा - 
आपल्याला ठरावीक काळासाठी कर्ज दिलं जातं. म्हणजेच परतफेड करण्यासाठी बँकेकडून तुम्हाला ठरावीक कालावधी दिला जातो. जर एखादं कर्ज तुम्ही ठरवीक वेळेपेक्षा आधीच फेडलं तरही तुम्हाला प्रीपेमेंट चार्ज द्यावं लागतं. मात्र, ओव्हरड्राफ्टबाबत असं नाही. तुम्ही कालावधीच्या आधी पैसे बँकेला परत केल्यास तुम्ही जितक्यादिवस पैसे वापरतेल तेवढ्याच दिवसाचं व्याज भरावं लागतं.  त्यामुळेच इतर कर्जांपेक्षा ओव्हरड्राफ्ट फायद्याचं आहे.  

काय घ्याल काळजी?
जर तुम्हाला ओव्हरड्राफ्टद्वारा घेतलेली रकम फेडणता आली नाही तर तारण ठेवलेली वस्तू जप्त करण्यात येते. जर तारण ठेवलेल्या वस्तू पेक्षा जास्त कर्ज घेतलं असेल तर उर्वरीत रकम तुम्हाला बँकेला द्यावी लागते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

Pune Crime : सहा महिन्यांच्या बालकाची तीन लाखांत विक्री; बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीला कर्नाटकातून अटक

RTE Admission : आरटीईच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

SCROLL FOR NEXT