Share Market Latest Updates | Stock Market News Sakal
अर्थविश्व

हा शुगर स्टॉक देईल तगडा परतावा, एक्स्पर्ट्सना विश्वास...

शेअर मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी आज पोन्नी शुगर्स इरोडमध्ये (Ponni Sugars Erode) गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

शिल्पा गुजर

Share Market Investment: सध्या शेअर बाजारात गुंतवणूक करणं तुम्हाला फायदेशीर ठरु शकते, अशात तुम्ही काही चांगले शेअर्स शोधत असाल तर आम्ही मार्केट एक्सपर्टच्या मदतीने एका शेअरची निवड केली आहे. मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी आज पोन्नी शुगर्स इरोडची (Ponni Sugars Erode ) निवड केली आहे. यात पैसे गुंतवून येत्या काळात चांगला नफा कमावता येऊ शकतो असा विश्वास जैन यांनी व्यक्त केला आहे.

पोन्नी शुगर्समध्येच (Ponni Sugars Erode ) का खरेदी करावी ?

पोन्नी शुगर्स (Ponni Sugars Erode ) खूप जुनी कंपनी आहे ज्याचा फायदा मिळतो असे मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी सांगितले. त्यामुळेच यात मजबूत नफ्यासाठी पैसे गुंतवण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. पोन्नी शुगर्स (Ponni Sugars Erode ) कंपनी 1.5 टक्के डिविडेंड यील्ड देते.

पोन्नी शुगर्स (Ponni Sugars Erode )-

सीएमपी (CMP) - 275 रुपये

टारगेट (Target) - 320 रुपये

कंपनीचे तिमाही निकाल ?

पोन्नी शुगर्स (Ponni Sugars Erode ) कंपनीने मार्च 2021 मध्ये 8 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता तर कंपनीने मार्च 2022 मध्ये 11 कोटी रुपयांचा नफा सादर केला आहे. याशिवाय विदेशी आणि देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांचा शेअरमध्ये हिस्सा सुमारे 22 टक्के आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Rule: उत्तर प्रदेशमध्ये 1200 कुटुंबांचा गॅस पुरवठा रोखला; 413 कुटुंबांचे कनेक्शन तोडले, नेमकं कारण काय?

'दृश्यम ३' थिएटर गाजवतोय पण ओटीटीवर अचानक ट्रेंड होतोय अजय देवगनचा ११ वर्ष जुना चित्रपट; तुम्ही पाहिलाय का?

अल निनोमुळे 'पाणीबाणी', राज्यात ऑगस्ट २०२७पर्यंत पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय, साठा राखीव ठेवण्याचे आदेश

७५ वर्षीय आजोबांचं नातीसोबत अश्लील वर्तन, संतापलेल्या २० वर्षीय तरुणीने आजोबांना संपवलं; क्रिकेट बॅटने डोक्यात वार करत...

WCL 2026, IND vs PAK: पाकडे पुन्हा तोंडावर आपटले! भारताकडून हवी होती लेखी माफी पण... क्रिकेटच्या मैदानात राडा

SCROLL FOR NEXT