savatkada waterfall blog
savatkada waterfall blog 
Blog | ब्लॉग

सवतकडा धबधब्याजवळ 5 जणांचा जीव वाचवणारा देवदूत

शांताराम पाटील

रविवार (८ जुलै) ला 'सिध्दनाथ जिम' मधील सर्व सहकारी मित्र वर्षा सहलीसाठी राजापुर येथील सवतकडा धबधब्यावर जाण्यासाठी सकाळी इस्लामपुर येथुन निघालो. दुपारी त्याठिकाणी पोहचलो असेन, त्यावेळी मोठ्या पावसाला सुरवात झाली होती. आम्ही सर्वजण धबधब्याच्या दिशेने दरीत खाली उतरु लागलो,  खाली उतरताना हजारो पर्यटक खाली उतरत होते तर तेवढेच बाहेर पडत होते. उतरतानाच त्याठिकाणच्या गंभीर परस्थितीचा अंदाज आला, खाली उतरल्यावर धबधब्याच्या समोरील नदीपात्रात शेकडो लोकं कुटुंबासह पाण्यात खेळत होते. आम्हीही १६ जण त्यात सामील झालो. हळूहळू धबधब्याच्या खाली पोहचलो. १० मिनिटातच मुसळधार पावसाचा जोर आणखी वाढला. धबधब्याच्या बरोबर खाली असल्याने पाणी वाढायला लागल्याचे आमचे मित्र संपतराव पाटील, डॉ श्रीयोग पाटील, दिपक पाटील, अमोल ठाणेकर, विवेक शेटे, नितीन फल्ले, विनायक पाटील, इंद्रजीत रानमाळे, राजेश मोहीते या मित्रांच्या लक्षात आले. "बाहेर चला..." असे त्यांनी सुचवले. आम्ही सुध्दा लगेच इतरांना बाहेर पडा पाणी वाढतयं, असे ओरडुन सांगत बाहेर येऊ लागलो. आमचे मित्र काठाकडे सरकले मी व बाबु उर्फ ऋतूराज पवार अजुन पात्राच्या मध्यभागीच होतो. तेवढ्यात पाण्याचा लोट आला व लोक वाहू लागली. आम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न केला पण चारजण वाहुन गटांगळ्या खात आमच्या दिशेने आली. बाबू आणि माझ्यात ५ फुटाचे अंतर असेल. मी ओरडलो, "बाबु या लोकाना पकड", त्यातील दोन जण बाबुच्या हाताला लागली व दोन माझ्या हाताला लागली.   

मी त्यांना पकडुन बाहेर ढकलले. ज्या दोन लोकांनी बाबुला पकडले त्याठिकाणी बाबुचा पण हात सुटला. बाबु वाचव असे मी ओरडलो बाबुने त्या लोकांना माझ्याकडे ढकलले व तो स्वतः गटांगळ्या खाऊ लागला. मी त्या दोघाना बाहेर ढकलुन बाबुला धरायला पुढे जायचा प्रयत्न करत होतो पण पाण्याचा प्रवाह मला मागे खेचत होता. माझे मित्र व आम्ही मोठ्याने ओरडत होतो. बाबु पैलवान असल्याने व त्याचा रोजचा चांगला व्यायाम असल्याने त्याने पाय घसरल्यावर दगडाला ताकदीने धरले होते. दुसऱ्यांना वाचवायच्या नादात आम्ही अडचणीत आलो होतो. क्षणभर बाबुच्या या परस्थितीला मी कारणीभुत असल्याचे मनात वाटले. या दरम्यान आमच्या सर्व मित्रांनी माझ्यापर्यंत एकमेकांच्या हाताला धरुन साखळी केली होती. मी ओरडत होतो, "माझ्या दिशेने ये". बाबुने त्याही प्रसंगात ताकदीचा व युक्तीचा वापर करत माझ्या दिशेने उसळी मारली व बाबु माझ्या पर्यंत पोहचला. बाबु बाहेर आला तोपर्यंत आणखी एक वाहत आला, त्याला बाबुने व मी हाताला धरुन बाहेर ओढले. एकुण ५ जणांना मृत्यूच्या दाढेतुन बाहेर काढले होते. 

एकमेकाला मिठी मारत सुखरुप असल्याचा आनंद घेत होतो तोपर्यंत आणखी दोघेजण झुडपाचा आधार घेवुन अडकलेचे दिसले. नुसता आरडाओरड सुरु होता काय करावे सुचेना या प्रसंगातुन बाहेर आलेला बाबु म्हटला मी वर जावुन रस्सी घेवुन येतो. इतर वेळी जी दरी वर चढुन खाली यायला किमान अर्धा तास लागेल, ती दरी चडुन बाबु दहा मिनीटाच्या आत उतरुन काळजीने दोरी घेवुन बाबु आमच्यापर्यंत आला होता. पावसाने रौद्र रुप धारण केल्याने पाणी प्रचंड वाढले. या दरम्यान रत्नदुर्ग माउंटेनीरींगचे लोक जे की धबधब्याच्या वर होते ते खाली आले होते. ते व आम्ही असे एकत्रीत अडकलेल्या लोकाना वाचवायची मोहीमे सुरु झाली. त्यांनाही दोरीने अथक प्रयत्न करत बाहेर काढले. जल्लोष करत बाहेर पडलो पण बाबुने माझ्या शब्दाखातर केलेली कामगीरी बाबुविषयी मनात मोठा अभिमान निर्माण करुन गेली. 

बाहेर आल्यावर ज्या लोकाना वाचवले त्या लोकांनी बाबुला मिठी मारुन आमच्या साठी तुम्ही देवदुत ठरला, असे म्हटल्यावर डोळ्यातुन पाणी आले. ते अश्रू पावसामुळे इतराना दिसले नसले तरी ते बाबुच्या व माझ्या धाडसासाठी होते. आजपर्यंत केलेल्या चांगल्या कामामधील हा प्रसंग अविस्मरणीय आहे. आम्हाला धबधब्यापर्यंत पोहचायला तब्बल दोन तास प्रवासात उशीर झाला होता. तो उशीर हा आमच्या हातुन चांगले घडणार म्हणुच होता असे मनोमन वाटले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Election Results Live : 12 व्या फेरी अखेर ८६,००० मतांनी शशिकांत शिंदे आघाडीवर, उदयनराजे भोसलेंची पिछाडी

Aurangabad Lok Sabha: औरंगाबादमध्ये कांटे की टक्कर, खैरे पिछाडीवर, भूमरे की जलील? कोणी घेतली आघाडी

Kalyan Loksabha: एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे आघाडीवर, लवकरच मिळवणार विजयी आघाडी?

Solapur lok sabha result: प्रणिती शिंदेंनी सोलापुरात भाजपचा विजयरथ रोखला? राम सातपुतेंवर 23 हजार मतांची आघाडी

India Lok Sabha Election Results Live : अयोध्येत भाजप पिछाडीवर! बंगालमध्ये पुन्हा ममताचा डंका... तृणमूल काँग्रेसची मोठी आघाडीवर

SCROLL FOR NEXT