World Photography day article
World Photography day article 
Blog | ब्लॉग

आज जागतिक छायचित्रदिन; आठवणींना उजाळा देणारी ती 'छायाचित्रे'

अशोक गव्हाणे

जे शब्दात लिहिता येत नाही तसेच जे बोलण्यातून व्यक्त होत नाही, ते एका छायाचित्राने स्पष्टं होत असतं. असं म्हणतात की, 1000 शब्द जेवढं सांगू शकत नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त एक छायाचित्र सांगून जातं. म्हणूनच, प्रत्येक छायाचित्रकार एक कलाकार असतो. अनेक छायाचित्रांना तो बोलकं करतो. 

आज जागतिक छायाचित्र दिन. आजपासून 177 वर्षांपूर्वी 1839 साली छायाचित्रणाची सुरवात झाली. फ्रान्सने 1939 ला या आविष्काराला मान्यता दिली. म्हणूनच आज म्हणजेच 19 ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्र दिनाच्या रुपात साजरा केला जातो. हा दिवस त्या छायाचित्रकारांच्या कामाला प्रोत्साहित करण्यासाठी साजरा करतात ज्यांनी आपले अनमोल योगदान छायाचित्रणासाठी दिले आहे.

"जागतिक छायाचित्रण दिन" सर्वप्रथम भारतात 19 ऑगस्ट 1991 साली साजरा करण्यात आला. त्यानंतर, दरवर्षी 19 ऑगस्ट हा जागतिक छायाचित्रण दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. पूर्वी कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी पंधरा-वीस दिवसांची वाट पाहावी लागत असे. आता मात्र, काळ बदलला अन् छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली. रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते मोबाईलने टिपलेले छायाचित्र काही सेकंदांत आपल्याला पाहता येते. यामध्ये, नवनवीन अविष्कार येत गेले आणि छायाचित्रण समृद्ध होत गेले.
 


प्रकृतीने प्रत्येक माणसाला आपल्या डोळ्यांच्या रुपात जन्मताच एक कॅमेरा दिला आहे. ज्यामुळे ते प्रत्येक वस्तूच्या छवीला आपल्या डोक्यात अंकित करू शकतो. तसे पाहिले तर प्रत्येक माणूस एक फोटोग्राफर आहे. वैज्ञानिक दृष्टीने माणसाने आपले साधन वाढविण्यास सुरवात केली आणि अनेक अविष्कारासोबत कृत्रिम लेन्सचा पण अविष्कार झाला. वेळेसोबत समोर चालतांना या लेन्सच्या छायाचित्रांना स्थाई रुपात समोर आणले. याच प्रवासाच्या यशाला आपण एक प्रकारे आपण छायाचित्रण दिनाच्या रुपात साजरे करतो.
या विशेष दिनानिमित्ताने ई सकाळ इंस्टाग्रामवरील काही खास छायाचित्रे....  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT