women
women 
Blog | ब्लॉग

जिला चुलीपुढं बसावं लागतंय तिलाच कळू जाणं

गणेश शिंदे

लग्नाला दहा पंधरा वर्षे झाली. लग्न झाल्या पासून सगळं व्यवस्थित चाललेलं. काम-धंदा रोज उपसाव लागायचा. घरचं काम करून कामाला पळावं लागायचं कारभाऱ्यांच्या बराबर. सकाळी घाई घाईत घास तुकडा खायचा तर कधी सकाळची भाकर दुपारच्याला खायला लागायची. घरात सासू-सासरा यांचं सगळं पाहायचं. एक शेळी दोन करढं; एक बोकड एक पाठ. 

एक दोन वर्षांनी आम्हाला लेकरू-बाळ झालं. म्हणलं कसं तरी हळू हळू संसार लागलाय धक्क्याला. आपण रोज जरी लोकांचा धंदा उपसत असलो तरी पोराला मातर शिकायचं. कमीत कमी सावलीत बसून तरी खाईल दोन टायमाला तुकडा. उग आमच्या जिन्याची झालीय कुत्र्या सारखी फरफट. पण त्याची तर नको. घर म्हणलं तर पाऊस आला तर फकस्त एका थेंबाची दोन थेंब होतील एवढाच आसरा. लोकांच्या हितं कामाला गेलं तर येताना ईचारून थोडं फार सरपण घेऊन यायचं सायपाक करायला. कव्हा कव्हा दुसऱ्याच्या वावरातून सरपण आणलं की दुसऱ्या दिवशी बायका बांदावर उभा राहून श्या द्यायच्या. तसं त्यांचं तरी काय चुकतंय ? जिला चुलीपुढं बसावं लागतंय तिलाच कळू जाणं की किती लागतंय चुलीला ते.

आयुष्याची सोनं व्हावं. लंय मोठं सपान बघावं असं काही नाही. नुसतं बघून तरी काय होणार ?
आणि त्यातली त्यात नवरा कव्हा मव्हा दारू ढोसायचा. आमची बारीक सारीक गोष्टीवरून तिर्गी मीर्गी झाली की लागायचा श्या द्यायला. म्हणायचं निघून जा इथून. लंय नीट वागतीस व्हय मला समजून सांगायला. पितोयच मी ! कव्हा मव्हा त्यात तुम्ही कुरकुर कोण ईचारणारी तू ?

इथं दारू सरकारमान्य हे आणि तू मला येड्यात काढतेस ? तुला जास्त कळतंय की सरकारला ? मी आपल्या कर्माला दोष देत बसायची पोराला जवळ घेऊन. कुठं त्याच्या मेल्या च्या तोंडाला लागायचं म्हणून मी तर त्याला पिऊन आल्यावर ईचारायचं सुद्धा बंद केलं. कशाला ईचारायचं काय करायचंय ते कर. पण म्हणत्यात ना सोबत गुण की संगत गुण अशी अवस्था झालीय त्याची. जशे जोडीदार भेटले तशेच नाद लागले ह्याला.

एक पोरगं हे त्याला शिकायचं. कमीत कमी पत्र्याची खोली उरगाडून चांगली खोली बांधून ठेवावं लागेल की त्याला उद्या ईचारलं की काय केलं माझ्या साठी तर सांगायला नको का? कोण परका पाव्हना आला तर त्याला बसायला नीट जागा नाही. आणि ह्यो घालतोय दारू ढोशिण्यात पैसे..शेवटी कर्माची आटा आटी बाकी काय.
(कथा पूर्णतः काल्पनिक आहे. कोणाशी याचा काही संबंध आल्यास योगायोग समजावा)
क्रमशः

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

SCROLL FOR NEXT