aylan kurdi
aylan kurdi 
Blog | ब्लॉग

सीरियातील मुले भावनिक ताणतणावाची शिकार

परशराम पाटील

साधारण दीडऐक वर्षापूर्वी ऐनमेन तीन वर्षाचा युध्दग्रस्त सिरियातील चिरमुडा आयलन कुर्दी तुर्कीतील भुमध्य समुदाच्या लाटांमध्ये गटांगळ्या खाऊन खाऊन किनारयावरील वाळूत निपचिप तोंड घालून पडला होता आणि त्यावेळी युद्धाने होरपळत असलेल्या सिरियातील निर्वासित कुंटुबांचे व युद्धबाधित मुलांचे भीषण वास्तव जगासमोर आले होते. जगातील सर्वच घटकांकडून सिरियामध्ये कौर्याची परिसीमा गाठली गेली आहे पण कुणालाही माणुसकीचा अजून पाझर फुटलेला नाही हे जळजळीत सत्य आहे. सहा वर्षापासून अंतर्गत यादवी व रक्तपिपासू आयसिसमुळे या भीषण नरसंहारात आतापर्यंत चाळीस लाख निष्पाप जीवांनी प्राण गमावला असून लाखो संसार रस्त्यावर आले आहेत. या नरसंहारात मानवी जीवाची कवडीमोलाचीही किंमत न राहिलेल्या सिरियात दहा ते बारा वयोगटातील मुलांची परिस्थिती तर अक्षरशः काळीज पिळवटून टाकणारी आहे.
 
"सेव्ह द चिल्ड्रन" व त्यांच्या सहकरी संस्थांनी केलेल्या एका पाहणी अहवालाने सिरियातील चिमुरड्या जीवांचे वास्तव समोर आले आहे. अत्यंत धक्कादायक म्हणजे ही मुल "टाॅक्सिक स्ट्रेस" ची शिकार होत असल्याचे उघड झाले आहे. अशा प्रकारच्या तणावामुळे मुलांच्या मेंदुच्या जडणघडणीवर तीव्र परिणाम होऊन चिडचिडेपणाची लक्षणे दिसून येतात. त्याचबरोबर स्वतःला इजा करून घेणे व आत्महत्येचा प्रयत्न करणे असेही प्रकार होत असल्याचे वरील अहवालात उघड झाले आहे. जवळपास 70 टक्के मुलांशी संवाद साधल्यानंतर सर्वांमध्ये "टाॅक्सिक स्ट्रेस"ची लक्षणे दिसून आली. सिरियातील युद्धात सहा वर्षाचा काळ लोटला असून या कालावधीत मुलांच्या जडणघडणीवर व त्यांच्या जीवनमानावर विपरित परिणाम झाला आहे.
 
"सेव्ह द चिल्ड्रन" च्या पाहणी अहवालामध्ये सहभागी असणारया महमंदने सांगितले की, "मुले नेहमीच तणावाखाली दिसून आली. दरवाजा उघडला तरी किंवा खुर्ची हलवली तरी मुल चलबिचल व्हायची कारण त्यांच्या पोटात भीती असायची ती म्हणजे हा विमान किंवा राॅकेटचा आवाज आहे. मुल सातत्याने त्यांच्यापासून दुर होण्याचा प्रयत्न करायची व त्यांना संस्थेच्या कामात भाग घ्यायला आवडत नसायचे. तरूण मुलांमध्ये अनैच्छिकपणे लघवी करण्याचा प्रकारही दिसून आला." फिरास आपल्या मुलाचा अनुभव कथन करताना म्हणतो, "कुठल्यातरी मुलाला त्याच्यासमोर मारल जात आहे त्यामुळे मलाही ते मारून टाकतील अशा प्रकारची स्वप्न पडल्याचे सांगत तो मध्यरात्रीत झोपेतून जागा होतो."
 
"सेव्ह द चिल्ड्रन" संस्थेने सिरियातील अलेप्पो, दमास्कस, दारा, हसाकाह, होमस आणि इदलीब आदी शहरांमधील मुलांच्या सद्यस्थितीचा अभ्यास केला. आयसिस व सिरिया सरकारच्या ताब्यात असलेल्या भागामध्ये त्यांना परिस्थिती जाणून घेता आली नाही. पण परिस्थिती फारशी वेगळी नसल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. हाला नावाची एका शिक्षिका आपला अनुभव सांगताना म्हणते " मुलांना मेलेल बर अस वाटू लागलं आहे. जेणेकरून या मरणयातनेतून सुटका होईल व स्वर्गात आम्हाला खाण्यासाठी व खेळण्यासाठी मिळेल. काहींना सैनिकांच्या हातून जखमी झाले तर बर होईल जेणेकरून रुग्णालयात नेलं जाईल व किमान तिथ खायला मिळेल. अस वाटू लागल आहे."

 काय सांगतो अहवाल
*युद्धामुळे 58 लाख मुल बाधित झाली असून त्यांना मदतीची गरज.
*अडीच लाख निष्पाप जीवांनी प्राण गमावला आहे.
* 48 लाख लोक अशा ठिकाणी अडकली आहेत की जिथ पोहोचण अशक्य आहे.
* जवळपास 50 लाख लोकांनी देश सोडला असून त्यामध्ये 23 लाख मुलांचा समावेश
*अधिकतर मुल भावनिक ताणतणावाची शिकार झाली आहेत.
*78 टक्के मुलांनी काहीवेळा अतिव दुःख वाटत असल्याचे सांगत आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली.
*458 मुलांवर अहवालावेळी लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. यामध्ये 13 ते 19 वयोगटातील मुलांचा व पुरुषांचा समावेश होता.
*51 टक्के पुरुषांनी किशोरावस्थेतील अनेक मुल तणावाशी झुंजण्यासाठी ड्रग्जकडे वळत असल्याचे सांगितले.
*दर चार मुलांमागे एका मुलाचा मानसिक स्वास्थ बिघडण्याचा धोका
* सलगच्या युध्दजन्य परिस्थितीमुळे शिक्षण क्षेत्राची पुर्णपणे वाताहत झाली आहे. त्यामुळे मुलांच्या जनजीवनावर गंभीर परिणाम
* "युनिसेफ"च्या अहवालानुसार आतापर्यत सिरियामधील तब्बल 4000 हल्ले शाळांवर झाले आहेत.  
* दोन तृतियांश मुलांनी आपल्या नातलगांना गमावले आहे. त्याचबरोबर निवाराही बाॅम्बहल्ल्यात नष्ट झाला आहे.
* काही ठिकाणी अधिक मानसोपचार तज्ञ गरजेचे असताना तब्बल 10 लाख लोकांमागे केवळ एकजण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT