Gofan esakal
Blog | ब्लॉग

गोफण | जंगलाचाही एक कायदा असतो, पण इथे...

संतोष कानडे

माणुसकीला काळीमा? छे! कोण म्हणतो असा?

शरीर बघून तुम्ही त्यांना माणसं समजताय,

इथंच तर खरी चूक करताय...

माणसं अशी वागत नसतात, दिवसाढवळ्या बाई नासवत नसतात

कुणीतरी म्हणालं, जंगली जनावरं आहेत ही...

पण जनावरांची म्हणून एक अस्मिता असते, त्याचं काय?

जनावरं अशी वागली कधी? आहे का काही पुरावा?

उठसुठ कुणाचीही बदनामी करण्याचा 'माणसाचाच' इरादा

जंगलाचंच म्हणाल तर त्यांचाही एक कायदा असतो

उलट तिथं तर मादीचा सन्मान असतो

तिच्या मर्जीबिगर वाघ जवळही येत नाही

तिच्या रक्षणासाठी मग जीवाचीही पर्वा करीत नाही

वरवर बघितलं तर दिसायला माणसंच दिसतील

नीट बघितलं तर नक्कीच 'माणसं' नसतील

कुठूनतरी श्वापदं आलीत, लचके तोडण्या तयार झालीत

कमरेखालच्या मेंदूवर किती ही मस्तीत आलीत

माणसाने माणूस जाळला, माणसच्या टोळक्याने बाई भोगली

माणसाने घरं पेटवली, माणसाने जातीसाठी माती खाल्ली

अरे खुळ्यांनो, पेवातले किडेसुद्धा अनंदाने नांदतात..

द्वेषाचा किडा बाजूला सारुन. पण तुम्ही तर माणसं!

तुम्ही मरा असेच एकदाचे 'गड्याहो', असाही तुमचा उपयोग काय?

पुढची पिढी तुमच्यावर थुंकणारही नाही, नसेल त्यांच्याकडे माय

लेकरं अंधारात, बाया दहशतीत.. आता करणार तरी काय?

तुमच्या या पापाला असावी कठोर सजा.. पण इथले राज्यकर्ते घेतायत मजा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT