Marathi Bhasha Din love foreign language as much as our language
Marathi Bhasha Din love foreign language as much as our language SAKAL
Blog | ब्लॉग

'आपल्या भाषेइतकेच परभाषेवर देखील प्रेम करायला हवं'

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. रघुनाथ कडाकणे

अनुवादाच्या माध्यमातून आपल्या भाषेच्या संवर्धनासाठीदेखील आपला हातभार लागू शकतो. याकरिता भारतीय भाषांबरोबरच इंग्रजी आणि इतर परदेशी भाषा सखोलपणे आत्मसात करण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यातील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेता अनुवाद कौशल्याच्या आधारे करिअरच्या अनेक संधी मिळण्याचे मार्ग खुले झाले आहे. त्यावर मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने मारलेली ही फुंकर...

27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने मराठी भाषेच्या गौरवपूर्ण वारशाचे स्मरण करणे उचित आहेच. परंतु त्याच्या बरोबरीने मराठीची सद्यःस्थिती आणि तिचे भविष्य याविषयीदेखील मंथन करणे योग्य ठरेल. तसेच व्यवहाराच्या पातळीवर मराठी भाषिकांसाठी कोणकोणत्या करिअरच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील, याचादेखील विचार करणे आवश्यक आहे. अशा क्षेत्रांपैकी एक म्हणजे अनुवादाचे क्षेत्र होय.

वस्तुतः भाषा हे मानवी संवादाचे प्रमुख माध्यम आहे. माणूस आपल्या भाव–भावना, कल्पना आणि विचार भाषेद्वारा इतर माणसांपर्यंत पोहचवत असतो. पण अशा अभिव्यक्तीमध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तींची भाषा समान असणे गृहीत असते. दोन भिन्न भाषिक व्यक्तींमध्ये केवळ आपापल्या भाषेच्या आधाराने यशस्वी संवाद होणे तसे असंभव असते. अशा वेळी या दोघांना जोडू शकेल, अशा समान भाषेची अथवा तिचे ज्ञान असणाऱ्या व्यक्तीची निकड असते. मौखिक संवादाच्या बाबतीत हे काम दुभाषाचे असते तर लिखित अभिव्यक्तीमध्ये तेच काम अनुवादकाचे असते.

आज माहिती-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेकानेक संवादमाध्यमे उपलब्ध होत आहेत. उदाहरणार्थ, वेगवेगळ्या संगणक प्रणालींद्वारे तसेच मोबाईल अॅपच्या माध्यमातून अगदी सहजपणे यंत्रानुवाद करणे शक्य झाले आहे. इतकेच काय, थेट संवादादरम्यानही लगोलग भाषांतर करणे आता सहजशक्य झाले आहे. असे असले तरी येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अनुवाद हे नुसते तंत्र नाही. कारण मुळात भाषा ही मानवाने निर्माण केलेली असली तरी त्याच्यासोबतच सातत्याने उत्क्रांत होत आलेली ती एक सचेतन गोष्ट आहे. ती मानवाइतकीच गुंतागुतीची आहे. त्यामुळे अनुवादाची प्रक्रिया कितीही तंत्रशरण झाली तरी त्यातली सर्जनशीलता अबाधित ठेवण्यासाठी निष्णात अशा अनुवादकांची गरज भविष्यातही राहणारच आहे.

आजकाल उत्तम अनुवाद करू शकणाऱ्या व्यक्तींना करिअरच्या मोठ्या संधी आहेत. शिक्षण, उद्योग-व्यवसाय, कॉर्पोरेट विश्व, पर्यटन, सेवा क्षेत्र, क्रीडा, प्रसिद्धी माध्यमे, जाहिरात, मनोरंजन, तसेच आरोग्य क्षेत्र, सैन्यदले, पोलिस यंत्रणा, न्यायपालिका, माहिती-तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांत अनुवादकांना नामी संधी उपलब्ध आहेत. अनुवादाच्या माध्यमातून चांगल्या तऱ्हेचे अर्थार्जन तर होऊ शकतेच. शिवाय अनुवादक म्हणून स्वतःची ओळखही निर्माण करता येऊ शकते.

अनुवादाच्या माध्यमातून आपल्या भाषेच्या संवर्धनासाठीदेखील आपला हातभार लागू शकतो. याकरिता भारतीय भाषांबरोबरच इंग्रजी आणि इतर परदेशी भाषा सखोलपणे आत्मसात करण्याचा प्रयत्न करायला हवा. मुख्य म्हणजे अनुवादकाने भाषेविषयीची सजगता आणि अभिरूची निरंतर जपायला हवी. आणि, मुख्य म्हणजे, आपल्या भाषेइतकेच परभाषेवरदेखील निरपवादपणे प्रेम करायला हवे.

अनुवाद हे एक उच्च कोटीचे कौशल्य

अनुवाद हे एक उच्च कोटीचे कौशल्य आहे. अनुवादासाठी किमान दोन भाषांचे उत्तम ज्ञान असणे अभिप्रेत असते. अर्थात, केवळ दोन भाषा अवगत झाल्या म्हणजे आपोआप अनुवाद करता येईलच असे नाही. त्यासाठी दोन्ही भाषांच्या स्वभाव-प्रकृतीचे, सामाजिक– सांस्कृतिक परिवेशाचेही यथार्थ भान असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, एखादा संदेश एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवादित करीत असताना केवळ त्या भाषेतील पर्यायवाची प्रतिशब्द योजणे म्हणजे अनुवाद नव्हे. प्रस्तुत संदेश मूळ भाषेत जसा असेल किंवा मूळ लेखकास जसा अभिप्रेत असेल शक्यतो तसाच दुसऱ्या भाषेतून पोहचायला तर हवाच. परंतु त्याचवेळी तो ज्या भाषेत अनुवादित केला गेला आहे त्या भाषेतही तो कृत्रिम आणि उपरा वाटता कामा नये. अस्सल अनुवादाचे गमक असते ते येथेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT