3MPSC_Classes.jpg
3MPSC_Classes.jpg 
Citizen Journalism

एमपीएससी, युपीएससीच्या परिक्षांचा बाजार आणि विद्यार्थ्यांची बरबादी

अभिषेक आकणकर

स्पर्धा परीक्षेचं खूळ डोक्यात घेऊन कलेक्टर होण्याची स्वप्नं पाहत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तरुण मुलंमुली पुण्यात येतात. ऐन विशीच्या वयात येतात आणि इथे दहा-दहा वर्ष राहतात. आज यांची संख्या काही हजारात असेल. ही युवा पिढी शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नवी पेठ येथे कॉट बेसिसवर जुन्या वाड्यात, ढेकणांच्या खोलीत अनेक वर्ष काढतात.

सरकारात काही शेकडा जागा निघणार आणि त्या जागेसाठी दावेदार मात्र काही हजारात असतात. स्पर्धा परीक्षा क्लासेस, स्वतःला मार्ग न सापडलेले मार्गदर्शक गल्ली बोळात असतात. जोडीला मेस, लायब्रऱ्या आणि स्टडी रूमचा धंदा चालुच असतो. 
बारावी नंतर गाव, आईबाप सोडून पुण्यात यायचं. सणावाराला सुद्धा घरी जायचं नाही. मुक्त विद्यापीठातून बीए किंवा बीकॉमला प्रवेश घ्यायचा. कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तरी फक्त परीक्षेपुरतं फिरकायचं. दिवसभर लायब्ररीत बसायचं, ४-५ पेपर वाचायचे, रात्रीपर्यंत अभ्यास करायचा. अशीच तीन वर्ष गेल्यांनंतर हाती काहीही नसतं. जेमतेम पास अशी डिग्री असते. खोट्या आशेवर झुळवणाऱ्या त्याच त्या प्रेरणादायी रटाळ कथा ऐकवतात.

ऐन उमेदीच्या काळात, कॉलेज लाईफ एन्जॉय करायच्या वयात, नवनव्या संधी, अनुभव घेण्याच्या काळात हि युवा पिढी खोट्या आशेवर लुबाडली जाते. गल्लोगल्ली क्लासेसचा बाजार मांडतात आणि अकरा महिन्यांसाठी ५० ते ६० हजार रुपये फी आकारतात. पुण्यात खोली, जेवण, पुस्तकं, कपडे यांचा खर्च  इतका कि, हाती कथिलाचा वाळा देखील राहत नाही. हि भीषण वास्तवता कुणी स्विकारायला तयार नाही.दरवर्षी उन्हाळा संपला की हजारोंच्या संख्येने लोंढे पुण्यात येतात. प्रत्येकालाच आयएएस आयपीएस व्हायचं असतं. ज्यांची स्वप्नं पूर्ण होतात ते सत्कारामूर्ती, प्रेरणास्थान होतात.  त्यांच्या कथा सांगून सांगून पुन्हा क्लासवाले गरिबांचे लचके तोडातात.

कधी संपणार हे दुष्टचक्र? डोळ्यांमध्ये साठवलेल्या स्वप्नांमागच भीषण वास्तव कधी समजणार? स्वीकारणार तरी कधी..? रेल्वे भरती, पोलीस भरती, बँक भरती, प्राध्यापक भरती या सगळ्या भरती मध्ये आयुष्याला ओहोटी लागली हेच खरं...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT