Astro Tips esakal
संस्कृती

Astro Tips : गरीबी होणार छूमंतर, करा या डाळीचा उपाय

किचनमध्ये असलेल्या उडीद डाळीचेही अनेक फायदे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिलाच्या घरात एका मागून एक अनेक अडचणी येत होत्या. देवधर्म, उपवास,नवस करूनही काही फायदा होत नव्हता. निराश झालेल्या शीलाने वास्तूशास्त्राचा आधार घ्यायचा ठरवला. त्यानुसार तिने घरात काही बदल केले. आणि तिच्या अडचणी दूर होऊ लागल्या.

वास्तूशास्त्रात सांगीतलेल्या उपायांचा उद्देश ग्रहांना शांत आणि मजबूत करणे हा आहे. तुमच्या किचनमध्ये असलेल्या उडीद डाळीचेही अनेक फायदे आहेत. ज्योतिषशास्त्रात याद्वारे उपायही सांगितले आहेत. ते अवलंबल्यास घराची आर्थिक स्थिती मजबूत होऊन सुख, समृद्धी आणि आनंद मिळतो.

तूमच्या प्रत्येक समस्येवर वास्तूशास्त्रात उपाय आहेत. फक्त त्याबद्दल माहिती नसल्याने आपले त्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे हे उपाय कोणते आणि ते कसे करायचे हे जाणून घेऊयात.

शनिवारी पलंगाखाली एका भांड्यात मोहरीचे तेल ठेवा. दुस-या दिवशी या तेलात उडीद डाळीचे गुलगुले बनवून गरिबांना आणि कुत्र्यांना खायला घालावे. असे केल्याने घरातील आर्थिक समस्या दूर होतात आणि गरिबी दूर होते.

शनिदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी उडदाची डाळ प्रभावी उपाय आहे. शनिवारी थोडी उडीद डाळ डोक्यावरून 3 वेळा उतरवून घेऊन कावळ्यांना खायला घाला. असे सलग 7 शनिवारी करावे त्याने शनिदोष दूर होतो.

लोखंडी वस्तू

जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करत असाल तर ऑफिसमध्ये छोटी लोखंडी वस्तू ठेवावी. त्याखाली स्वस्तिक चिन्ह बनवून त्यावर काळे उडीद ठेवावे. यावर आणलेली लोखंडी वस्तू ठेवा. असे केल्याने व्यवसायात खूप प्रगती होते.

पिंपळाचे झाडाचा उपाय

शनिवारी संध्याकाळी उडीदाच्या दोन दाण्यांमध्ये थोडे दही आणि कुंकू मिसळा. सलग २१ दिवस पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवावे. धान्य ठेवून परत येताना मागे वळून पाहू नका. या उपायामुळे आर्थिक समस्या दूर होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT