Astro Tips: मांजरीला धनाचे लक्ष्मी यंत्र का म्हटले जाते?

मांजरीचे दिसणे आणि घरात येणे शुभ असते.
cats
catsEsakal

आपण अनेकदा ऐकतो की मांजरीने जातांना रस्ता कापला तर त्याला लोकं अशुभ घटणा म्हणवतात, पण असे झाल्याने तुम्हाला धनप्राप्ती होते. मांजर जर तुमच्या रस्त्यात आडवी आली तर ती शुभ घटना समजावी. कारण मांजर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या श्रीमंत बनवू शकते, असाही अनेकांचा समज आहे. मांजरीची गर्भनाळ लक्ष्मी यंत्राचे काम करते.  मांजरीचे दिसणे आणि घरात येणे शुभ असते.

cats
Dream Astrology : स्वप्नांना हलक्यात घेऊ नका; 'या' गोष्टी दिसल्या तर धनलाभाची शक्यता

ज्योतिषशास्त्रात देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी आणि कुबेराला संपत्तीची देवता म्हटले जाते. असं म्हणायला हरकत नाही की जर एखाद्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा झाली तर त्या व्यक्तीच्या जीवनातील पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. ज्योतिषशास्त्रात मांजरीला लक्ष्मीचे रूप मानले जाते, त्यामुळे दीपावलीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करताना घरातील ज्येष्ठांना मांजर दिसल्यास ते शुभ मानले जाते.  मांजरीचे दर्शन होणे, मांजरीचे आगमन शुभ असते, असे म्हणतात.  त्याचबरोबर काही लोक याला अशुभही मानतात.

cats
Palm Astrology : हातावरची ‘ही’ ६ चिन्हे देतात संपत्ती अन् समृद्धी

ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की मांजरीची नाळ लक्ष्मी यंत्राचे काम करते, जर ती नाळ तुम्ही जपून आपल्याजवळ ठेवली, त्याची काळजी घेतली तर तुम्ही रातोरात श्रीमंत व्हाल.  माणसाच्या आयुष्यात कधीही गरिबी येणार नाही. खरतर मांजरीची नाळ सापडणे फार कठीण असते. असं म्हणतात की एखाद्याचं नशीब खूप चांगलं असेल तरच त्याला ती सापडते. जर तुम्हाला मांजरीची नाळ आढळली तर अशा स्थितीत त्यावर हळद लावा, असे केल्याने ते एक प्रकारचे लक्ष्मी यंत्र बनते.

लक्ष्मी यंत्र म्हणजे काय

लक्ष्मी यंत्र हे सर्वात पवित्र आणि शक्तिशाली साधन आहे, ज्याद्वारे तुमच्या जीवनात आर्थिकदृष्ट्या स्थैर्य येते. हे लक्ष्मी यंत्र केवळ संपत्तीचे प्रतीक नाही तर असाधारण सिद्धी आणि समृद्धीचे स्त्रोत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com