Astro Tips : दही साखर खाल्ली आहे का? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक फायदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Astro Tips

Astro Tips : दही साखर खाल्ली आहे का? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक फायदे

हेही वाचा: Astro Tips : असे दात असणाऱ्या लोकांना नसते पैशांची कमतरता

तुम्ही परीक्षा किंवा मुलाखत द्यायला जात असताना, तुमच्या आईने दही-साखर किंवा दही-पेडा खायला दिला असेलच.आत्ता तुम्ही असा विचार करत असाल की यामागे कोणते धार्मिक किंवा वैज्ञानिक कारण असेल, चला तर मग जाणून घेऊयात काय आहे यामागील नेमक कारण ...

हेही वाचा: Astro Tips: मांजरीला धनाचे लक्ष्मी यंत्र का म्हटले जाते?

वैज्ञानिक कारण

दही-साखर खाण्यामागे आणि कपाळावर दह्याचा टिळा लावण्यामागे वैज्ञानिक कारणे आहेत. दही अन्न पचण्यास मदत करते. दह्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-2, बी-12, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखी महत्त्वाची जीवनसत्त्वे असतात, जे आपल्याला ऊर्जावान बनवतात. साखर किंवा पेड्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. जे रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्याचे काम करतात. रक्ताभिसरणाद्वारे हे रक्त मेंदूपर्यंत पोहोचून स्मरणशक्ती मजबूत करते.

हेही वाचा: Astro Tips : आर्थिक संकट दूर करायचयं? मग घराच्या दारावर लटकवा ही वस्तु

आयुर्वेदिक कारण

उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्याची गरज असते आणि आयुर्वेदानुसार दही शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. तसेच साखरेत ग्लुकोज असते. जेव्हा आपण या दोन गोष्टी एकत्र खातो तेव्हा आपले शरीर थंड राहते आणि विश्रांती मिळते. अशा स्थितीत परीक्षा असो की नोकरीची मुलाखत, चिंता आणि तणाव अशात दही आणि साखर खाल्ल्याने शरीराला आवश्यक ऊर्जा आणि पोषण मिळते.