Kamika Ekadashi 2022: sakal
संस्कृती

Kamika Ekadashi 2022: पापमुक्त व्हायचं? एकादशी व्रत करा, येतील शुभ संकेत

जर मनाला क्लेश देणारी पापे आपल्या हातून कळत नकळत घडली असल्यास आज एकादशीचे व्रत अवश्य करावे.

सकाळ डिजिटल टीम

आज कामिका एकादशी असून दुपारी २ वाजून ३३ मिनिटांपर्यंत राहणार. आजचा दिवस शुभ आहे त्यामुळे तुमच्या मनातील मनोकामना दूर होतील. जर मनाला क्लेश देणारी पापे आपल्या हातून कळत नकळत घडली असल्यास आज एकादशीचे व्रत अवश्य करावे. यशाशक्ती उपवास करुन दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा. यामुळे तुमचे पापे दूर होतील.

आज कामिका एकादशीनिमित्त आळंदी येथे यात्रा आहे. विठ्ठलाची आराधना करण्यासाठी आणि एकादशीच्या शुभ मुहूर्तावर संताचे दर्शन घेण्यासाठी हा उत्तम योग आहे. आज तुम्ही एकादशी व्रत करुन तुमच्या मनातील इच्छा पुर्ण करू शकतात. याशिवाय या व्रताने तुमच्या हातून नकळत घडलेली पाप नष्ट होतील आणि तुम्ही पापमुक्त व्हाल.

आज कामिका एकादशीला तीन शुभ योग तयार होत आहेत - द्विपुष्कर योग, वृद्धी योग आणि ध्रुव योग. सूर्योदयापासून दुपारी २ वाजेपर्यंत वृद्धी योग असतील. यानंतर ध्रुव योग सुरू होईल. दुस-या दिवशी रात्री १० ते पहाटे ५:३८ पर्यंत द्विपुष्कर योग असेल.

याशिवाय कामिका एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. घरामध्ये कांदा, लसूणचे सेवन करू नये. एकादशीच्या पूजेच्या सकाळ संध्याकाळ शुद्ध वस्त्र परिधान करूनच व्रत कथा ऐकावी. एकादशीच्या पूजेमध्ये कुटुंबात शांततापूर्ण वातावरण ठेवा. या दिवशी आसनावर बसून 'ओम नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHP Garba Ban : गरब्यात मुस्लिमांना बंदी घालण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या मागणीला केंद्रीय मंत्र्यांचा विरोध; संविधानाचा दिला दाखला

'बोक्या सातबंडे' चित्रपटात पेपर विकणाऱ्या अभिनेत्याला ओळखलंत का? आज मराठीसोबतच बॉलिवूडही गाजवतोय, कोण आहे हा?

Marathi News Live Updates : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह उज्जैन ते अयोध्या पदयात्रा काढणार

Nanded News : नवसंशोधनाला मिळणार नांदेडची प्रयोगभूमी; ग्रामीण टेक्निकल कॅम्पसकडे ‘आविष्कार २०२६’ची धुरा!

Ambad News : तलावात खांदेमळणीला गाय, बैल धूण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय सौरभ नरोडेचा पाण्यात बुडून मृत्यू; धनगरपिंपरीसह परिसरात हळहळ व्यक्त

SCROLL FOR NEXT