Ashadi Ekadashi | नाशिकचे प्रतिपंढरपूर स्वयंभू दुसरे मंदिर

१७५५ ला पेशव्यांनी हे मंदिर बांधले होते.
Vitthal temple
Vitthal templeesakal

नाशिक : पंचवटी येथील रामघाटावरील अतिप्राचीन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विठ्ठल व रुक्मिणीची स्‍वयंभू मूर्ती असलेले मंदिर १७५५ ला पेशव्यांनी बांधले. नाशिकचे प्रतिपंढरपूर म्हणून स्वयंभू हे दुसरे मंदिर आहे. याचा पद्म पुरातन उल्लेख केला आहे. (Latest marathi news)

पंचभैय्ये वंशज (कै.) विश्वनाथ पंचभैय्ये,हे वयाच्या आठ वर्षापासून नेमाने गालव प्रभूती पंढरीच्या वारीस जात होते. वयोवृद्ध अवस्‍थेतही ते वारीला निघाले. मुखाने विठ्ठल नामाचा महिमा सुरू होता, पण ते फार अशक्त व वृध्द असल्याने त्यांना पुढे जाता येईना. तेव्हा ते फार दुःखी झाले. वारीस गेलेले लोक परत येईपर्यंत अन्नग्रहण करायचे नाही, असा निश्चय करून त्याच जागी बसून राहिले. त्यांची भक्ती पाहून पंढरीनाथ विठ्ठल ब्राम्‍हणाच्या रूपात येऊन त्‍यांच्या भक्तीची व निष्ठेची परिक्षा बघितली. नंतर रुक्मिणीसह त्यांना दर्शन दिले व भक्तांसाठी येथे येऊन थांबले.

Vitthal temple
Ashadi Ekadashi | आषाढीच्या वारीत विठूरायाला रशियन भक्तांनी घातलं साकडं

नाशिकला प्रतीदक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. त्याप्रमाणे पूर्ण भारतात प्रती पंढरपूर म्हणून हे स्वयंभू दुसरे मंदिर आहे. याचा पद्म पुरातन उल्लेख केला आहे. आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीला या ठिकाणी येऊन भाविक दर्शन घेतात. आजही आषाढी व कार्तिकी एकादशीच्या दिवशी महापूजेच्या वेळेस विठ्ठल रुक्मिणीचा वास त्या मंदिरात असल्याचा भास होतो. मंदिरात आषाढ शुद्ध दशमीपासून ते आषाढ कृष्ण प्रतिपदेपर्यंत विठ्ठलाचा उत्‍सव साजरा केला जातो. अभिषेक तसेच कुलधर्म करून पुरणाचा नैवेद्य दाखविला जातो तसेच उत्‍सवाची सांगता काल्‍याच्या कीर्तनाने होते. गोपाल काल्‍याचा प्रसाद प्रतिपदेला भाविकांना वाटण्यात येतो.

Vitthal temple
हिंदू- मुस्लीम ऐक्याचे दर्शन; आषाढी असल्याने ईदला ‘कुर्बानी’ नाही

''पंचभैय्ये परिवारातील अनेक पिढ्यांनी मनापासून व श्रद्धेने ही धुरा समर्थपणे सांभाळली. मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली चौदावी पिढी कार्यरत आहे. सर्व कुटुंबीय मोठया श्रद्धेने ही परंपरा सांभाळत आहोत.'' - अमित नारायण पंचभैय्ये, नाशिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com