Ganesh Festival 2023 esakal
संस्कृती

Ganesh Festival 2023 : बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी अशी करा उपासना

गणपती अथर्वशीर्षात 'एकदंताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि..' असा गणेश गायत्री मंत्र आलेला आहे. यावरून वैदिक काळापासून गणेश उपासना सुरू होती हे लक्षात येते.

गौरव देशपांडे

Ganesh Festival 2023 : आपल्याकडे अनादिकालापासून गणेशाची उपासना अव्याहतपणे सुरू आहे. वेदांमध्ये व बहुतांशी सर्व पुराणांमध्ये गणेशाविषयीचे मंत्र, कथा, विवेचन विस्तृत स्वरूपात आढळतात. ऋग्वेदात 'गणानां त्वा गणपतिं हवामहे..' हा याज्ञवल्क्य स्मृतीत विनायकः कर्मविघ्नसिद्ध्यर्थं मंत्र आलेला आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

यजुर्वेदात 'गणाश्रिये स्वाहा, गणपतये विनियोजितः । गणानामाधिपत्ये च रुद्रेण ब्रह्मणा तथा ॥ स्वाहा' हा मंत्र आलेला आहे. गणपती अथर्वशीर्षात 'एकदंताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि..' असा गणेश गायत्री मंत्र आलेला आहे. यावरून वैदिक काळापासून गणेश उपासना सुरू होती हे लक्षात येते.

पुराणांचा विचार केल्यास पद्मपुराण, लिंगपुराण, ब्रह्मवैवर्तपुराण, ब्रह्मांडपुराण यामध्ये गणेशविषयक आख्याने सविस्तर आलेली आहेत. गणेशपुराण व मुद्गलपुराण ही स्वतंत्र पुराणे फक्त गणेशविषयक व गणपतीच्या लीलांचे आहे आणि अवतारांचे वर्णन करणारी आहेत. मानव गृह्यसूत्र व याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये शाल, उष्मित, कटंकट, कुष्मांड, देवयजन इत्यादींचा विनायक म्हणून उल्लेख सापडतो. (Ganesh Chaturthi Festival)

अर्थात् भगवान शंकर व ब्रह्मदेवाने संकटे, विघ्न उत्पन्न करण्यासाठी विनायक या देवतेची नियुक्ती केलेली आहे. याचाच दुसरा अर्थ म्हणजे विनायकाच्या ( गणेशाच्या) उपासनेशिवाय विघ्न कशी दूर होतील ?

बृहत्पाराशर स्मृतीत गणेश उपासनेचा उल्लेख आलेला आहे. 'एतेन सम्पूज्य गणाधिदेवं विघ्नोपशान्त्यै' विघ्नशांतीसाठी गणपतीची पूजा करावी असे सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chadchan Crime Six Killed Land Dispute : महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवर जमिनीच्या वादातून हत्याकांड, सहा जणांची धारधार शस्त्रांनी हल्ल्यानंतर गोळ्या घालून निर्घृण हत्या

Latest Marathi Update Live: विदर्भातील पाचही विधान परिषद जागांसाठी काँग्रेसची जोरदार तयारी

Travels Bike Accident : खासगी ट्रॅव्हल्सची दुचाकीस धडक; चार तरुणांचा जागीच मृत्यू

Sai Sudharsan Hit Wicket: साई सुदर्शनची बॅट पुन्हा स्टम्पवर पडली, शुभमनने डोक्यावर हात मारला; विचित्र विकेटचा Video Viral

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ३० मे २०२६ ते ५ जून २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT