
Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पांना बुद्धीचा अधिपती म्हणतात. तो विघ्नहर्ता असून सर्वांच भलं करणारा आहे. गणपतीला सर्वात हुशार मानले जाते. गणपतीला सर्वच देवी-देवतांमध्ये धैर्यवान आणि बुद्धिवान मानले जाते. तो सुखकर्ता आहे त्यामुळ कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात बाप्पाला वंदन करूनच होते.
सध्या जगभर गणेशोत्सवाचा उत्साह पहायला मिळत आहे. तसं तर आपण लहानपणापासून गणपती बाप्पांच्या अनेक गोष्टी ऐकत आलो आहोत. पण, तुम्हाला हे माहितीय का की महाभारत हे महाकाव्य गणपतीबाप्पांनी लिहीले होते. महर्षी व्यासांनी ते बाप्पांना सांगितले आणि बाप्पांनी ते लिहीले.
पण, ते लिहीण्यासाठी बाप्पांनी महर्षी व्यासांना एक अट घातली होती. ती अट कोणती आणि बाप्पाला अशी अट का घालावी लागली याची कथा काय आहे. हे आपण जाणून घेऊयात.