Guru Purnima 2023 esakal
संस्कृती

Guru Purnima 2023 : गुरुपौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करण्याचं काय आहे महत्व?

Guru Purnima Date : गुरुपौर्णिमा सोमवार ३ जुलैला आहे. या दिवशी सत्यनारायणाची पूजा घालण्याची पद्धत काही भागात आहे.

धनश्री भावसार-बगाडे

Satyanarayan Puja On Guru Purnima : आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी करण्यात येते. याला आषाढ पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमाही म्हणतात. महर्षी वेदव्यास यांच्या विषयी आदर व्यक्त करण्यासाठी ही गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. असं मानलं जातं की, याच दिवशी वेदव्यासांनी आपल्या शिष्यांना भागवतपुराणाचे ज्ञान दिले, शिवाय वेदव्यासांचा जन्म या दिवशी झाला असं मानलं जातं म्हणून हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणून साजरा होतो.

शिवाय या दिवशी काही ठिकाणी भगवान सत्यनारायण कथा ऐकण्याची पद्धत आहे. यामुळे सर्व अडचणी दूर होऊन आर्थिक समृद्धी येते असं मानलं जातं.

पौराणिक मान्यतांनुसार वेद व्यास यांना भगवान विष्णूंचा अंश मानले आहे. म्हणून गुरु पौर्णिमेला त्यांची पूजा केली जाते आणि त्यांचेच रुप मानले जाणाऱ्या सत्यनारायण भगवानची कथा ऐकली जाते. विष्णू पुराणातही हे सांगण्यात आले आहे की, पौर्णिमा तिथी भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी महत्वाच्या तिथींपैकी एक समजली जाते.

जर तुमच्या घरात बऱ्याच काळापासून आर्थिक तंगी सुरू असेल किंवा व्यवसायात यश मिळत नसेल तर दर पौर्णिमेला सत्यनारायणाची कथा वाचावी. यामुळे धनवृद्धी होते. शिवाय नोकरीत बऱ्याच काळापासून अडचणी सुरू असतील तर त्यातही फायदा होतो.

गुरु पौर्णिमेचा पूजाविधी

  • जर गुरु पौर्णिमेला तुम्हाला सत्यनारायणाची पूजा शक्य झाली नाही तर विधीवत भगवान विष्णूंची पूजा केल्यानेही शुभ फळ प्राप्त होते.

  • या पूजेत तुळस, धूप, दीप, गंध, पुष्प आणि पिवळे फळ अर्पण करावे.

  • मनःपूर्वक देवाला नमस्कार करून स्मरण करावे. इच्छा मनात ठेवावी.

  • पूजे नंतर नैवेद्य दाखवावे. सर्वांना प्रसाद वाटावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

'दातापासून ते चेहऱ्याच्या हावभावापर्यंत; ‘दुआ तर अगदी रणवीरची कॉपीच’ नेटकऱ्यांनी रणवीरचे लहाणपणीचे फोटो काढले शोधून, Photo Viral

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

SCROLL FOR NEXT