Vastu Tips esakal
संस्कृती

Vastu Tips : शनिदोष सुरू झाला आहे? या रोपट्याने पडेल फरक!

जर तुमच्या कुंडलीत शनिदोष किंवा शनीचा प्रभाव असेल तर तुम्ही तुमच्या घरात शमीचे झाड लावावे

सकाळ डिजिटल टीम

Vastu Tips : वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या केल्याने आपल्या आयुष्यात खूप बदल घडतात; प्रत्येक झाड आणि वनस्पतीचे एक स्वतंत्र महत्व आहे. या वनस्पतीचे रूप, रंग, सुगंध, फळे आणि फुले हे सर्व वेगवेगळ्या ग्रहांशी संबंधित आहेत. कारण त्यांचा प्रभाव भिन्न आहे.

वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या केल्याने किंवा न केल्याने आपल्या आयुष्यावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होतात. हिरवीगार झाडे आपल्या जीवनात आशा आणि सौंदर्य आणतात. काही झाडे आपल्या घरात नशीब आणि समृद्धी आणू शकतात.

शमी वनस्पती किंवा शमीचे झाड अशीच एक वनस्पती आहे. घरात फुले आणि झाडे लावण्यासाठीही वास्तुशास्त्राचा वापर केला जातो. जेव्हा तुम्ही तुमच्या घरात झाड लावत असाल तेव्हा त्या झाडांची वास्तूही पाहणे आवश्यक आहे कारण वास्तूनुसार झाडे लावल्याने घरातील ऊर्जेवर परिणाम होतो.

शमीच्या झाडाबद्दल वास्तुशास्त्र काय सांगतं?

वास्तुतज्ज्ञांच्या मते, जर तुमच्या कुंडलीत शनिदोष किंवा शनीचा प्रभाव असेल तर तुम्ही तुमच्या घरात शमीचे झाड लावावे. हा एक उत्तम वास्तु उपाय आहे. जो तुमचा शनि दोष दूर करू शकतो.

नक्की कुठे लावावं शमीचं झाड?

शमीचं झाड लावण्याची बरोबर दिशा म्हणजे दक्षिण. जर पुरेसा आणि थेट सूर्यप्रकाश नसेल तर ते पूर्व किंवा ईशान्य दिशेलाही ठेवता ययेईल. शनिवारी शमीचे झाड लावणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार हे रोप नेहमी घराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला लावावे. यामुळे घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा येते, ज्याचा आपल्या जीवनावर चांगला प्रभाव पडतो.

शमीच्या झाडाचे फायदे

-संध्याकाळी शमीच्या रोपाजवळ दिवा लावून त्याची पूजा केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते.

-45 दिवस रोज संध्याकाळी शमीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावल्याने विवाहातील सर्व अडथळे दूर होतात.

-घराच्या ईशान्य कोपऱ्यात झाड ठेवण्याचा सल्ला दिला जातो. अशाने पैशाची कमतरता भासणार नाही.

-व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगती करण्यासाठी घरात शमीचे झाड लावणे शुभ असते.

-जर तुम्ही एखाद्या शुभ कामासाठी घराबाहेर जात असाल तर शमीला पाहूनच घराबाहेर पडा. असे केल्याने तुम्ही ज्या कामासाठी जात आहात त्यात यश मिळेल.

या गोष्टींची घ्या काळजी

शमी वनस्पती दैवी आणि अतिशय पवित्र आहे. त्यामुळे लागवड करताना स्वच्छ मातीच वापरावी. ते लावताना दिशेची काळजी घ्या. त्याचा वापर घरात करू नये. शमीचे रोप दक्षिण दिशेला टेरेसवर ठेवा. सूर्यप्रकाश मिळत नसेल तर पूर्व दिशेलाही लागवड करता येते. घराच्या मुख्य दरवाजाजवळ शमीचे रोप देखील लावू शकता. तुम्ही ही वनस्पती एका भांड्यात किंवा थेट जमिनीत लावू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

SCROLL FOR NEXT