Gajar Halwa Recipe: असा बनवाल गाजरचा हलवा तर बोटं चाटत रहाल...

गाजरामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ए, सी आणि फायबर असते
Gajar Halwa Recipe
Gajar Halwa Recipesakal

हिवाळ्याच्या दिवसांत हमखास घरी केला जाणारा पदार्थ म्हणजे गाजराचा हलवा; सगळ्याच वयोगटातील लोकांना गाजराचा हलवा खूप आवडतो. हिवाळा सुरू झाला की लाल चुटूक गाजर मोठ्या प्रमाणात बाजारात येतात. ते गाजर किसून त्यात तूप, साखर दूध किंवा मावा, ड्रायफ्रूट घालून केलेला हा हलवा अतिशय चविष्ट लागतो.

गाजर हे कुठल्याही सिझनला खाणे चांगले. पण हिवाळ्यात मिळणाऱ्या लालचुटूक गाजरांचा रोजच्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे. गाजरामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ए, सी आणि फायबर असते. व्हिटॅमिन ए डोळे, चांगली त्वचा आणि रोगप्रतिकारक शक्तीबरोबरच अँटिऑक्सिडंट्साठी महत्वाचे आहे

Gajar Halwa Recipe
Gajar Ka Halwa: हिवाळ्यात गाजरचा हलवा खा अन् कोलेस्ट्रॉल कमी करा

हलव्यात आपण तूप घालतोच. तूप हे अमीनो ऍसिड आणि अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण आहे. तुपामुळे आपली त्वचा निरोगी राहते आणि हाडे मजबूत होतात. त्यामुळे हिवाळ्यात गाजर हलवा खाल्ल्याने आपल्या आरोग्यात सुधारणा होऊ शकते.

Gajar Halwa Recipe
KHAVA GAJAR BURFI : नवीन वर्षाच्या स्वागताला घरच्या घरी तयार करा खवा गाजर बर्फी..

नक्की कसा बनवायचा गाजराचा हलवा?

साहित्य:

  • 1.2 किलोग्रॅम गाजर

  • 750 milliliter फुल क्रीम मिल्क

  • 1 चमचे तूप

  • 100 ग्रॅम साखर

  • आवश्यकतेनुसार बदाम

  • आवश्यकतेनुसार पिस्ता

  • आवश्यकतेनुसार मनुका

Gajar Halwa Recipe
Papaya Halwa Recipe: तुम्ही कधी पपईचा शिरा खाल्ला आहे का?

कृती:

  • गाजर स्वच्छ धुवून किसून घ्या

  • एका पॅनमध्ये साजूक तूप गरम करुन त्यात बारीक काप केलेले बदाम, पिस्ता व मनुके भाजून घ्या.

  • गॅसवर दुसऱ्या पॅनमध्ये तूप टाकून त्यात किसलेले गाजर छान भाजून घ्या, काही वेळाने गाजराचा रंग बदलेल आणि गाजर केशरी होईल.

  • आता त्यात फुल क्रीम दूध घालून 15 मिनिटे मिश्रण मध्यम आचेवर शिजवून घ्या.

  • दूध आटून घट्ट झाल्यावर त्यात २ मोठे चमचे साखर घाला. साखर विरघळून मिश्रणाला घट्टपणा येईपर्यंत ते शिजवा. आता त्यात वरुन १ चमचा साजूक तूपाची धार सोडा.

  • त्यामध्ये साजूक तूपात भाजलेले ड्राय फ्रुट्स मिक्स करा.

  • तयार आहे आपला पौष्टिक व स्वादिष्ट गाजर हलवा! गरमा गरम गाजर हलवा सर्व्ह करताना त्याला ड्राय फ्रुट्सनी गार्निशिंग करु शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com