देश

विमानात श्वसनाच्या त्रासामुळे 11 महिन्यांच्या बालकाचा मृत्यू

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कतार विमानात 11 महिन्यांच्या बालकाला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्याचा मृत्यू झाला. हे बालक त्याच्या कुटुंबियांसह विमानातून प्रवास करत होते. कतार विमानाच्या डोहा-हैदराबाद विमानात ही दुर्घटना आज (बुधवार) घडली. 

अर्णव वर्मा असे त्या बालकाचे नाव असून, विमानप्रवासादरम्यान या बालकाचा मृत्यू झाला. याबाबत हैदरबाद विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की अर्णव वर्मा आणि त्याचे पालक डोहा येथून विमान क्रमांक क्यूआर-500 मधून प्रवास करत होते. ज्यावेळी या बालकाला विमानात श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्याला तातडीने हैदराबाद येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्या बालकाची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करण्यात आले.

दरम्यान, ''विमानातील एक बालक हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी दगावल्याची बातमी समजताच आम्ही सर्व दु:खी आहोत. आम्ही त्या बालकाच्या कुटुंबियांचे सांत्वन करतो'', अशा शब्दांत कतार विमानतळाकडून शोक व्यक्त करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT