नवी दिल्ली- राजस्थानमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात सिरोही नगरपरिषदचे अध्यक्ष महेंद्रा मेवडा आणि माजी नगरपरिषद आयुक्त महेंद्रा चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंगणवाडीमध्ये काम देतो असं सांगून जवळपास २० महिलांवर बलात्कार केल्याचा या दोघांवर आरोप आहे. ( 20 women assaulted under the pretext of Anganwadi jobs in Rajasthan Sirohi case registered)
पाली जिल्ह्यातील एका महिलेने पोलीस स्टेशन गाठल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. महिलेने दावा केलाय की नोकरीचे प्रलोभन देऊन महेंद्र मेवडा आणि महेंद्रा चौधरी यांनी तिच्यावर आणि इतर जवळपास २० महिलांवर बलात्कार केला आहे. महिलेने असाही दावा केलाय की, आरोपींनी लैंगिक अत्याचाराचा व्हिडिओ शूट केला होता. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी देखील करण्यात आली होती.
आरोपींनी बदनामी करण्याची धमकी देत महिलांकडे प्रत्येकी ५ लाखांची मागणी केल्याचा दावा देखील करण्यात आलाय. तक्रारीनुसार, तक्रारदार महिला आणि अन्य महिला काही महिन्यांपूर्वी सिरोही जिल्ह्यात अंगणवाडीमध्ये काम करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना राहण्याची आणि जेवणाची सोय करणाऱ्या व्यक्तींनी अत्याचार केल्याचा आरोप आहे.
महिलांना देण्यात येणाऱ्या जेवणामध्ये काही तरी टाकण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला. शुद्धीवर आल्यानंतर आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती, असा दावा महिलेकडून करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस उपअधीक्षक पारस चौधरी म्हणाले की, महिलेने यापूर्वी एक खोटी तक्रार दाखल केली होती. मात्र, आठ महिलांच्या याचिकेनंतर राजस्थान हाय कोर्टाने तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले होते. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.