शिरगुप्पी : शेडबाळ (ता. कागवाड) येथे एकाचा खून करून मृतदेह उसाच्या शेतात टाकल्याची घटना रविवारी उघडकीस आली. शशिकांत कृष्णा होनकांबळे (वय ५५) रा. शेडबाळ असे खून झालेल्याचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची तक्रार शशिकांत यांच्या मुलाने कागवाड पोलिसांत (Kagwad Police) दिली आहे.