taliban Google
देश

अफगाणिस्तानात ३०० दहशतवादी ठार; चोवीस तासात कारवाई

सकाळ डिजिटल टीम

काबूल : अफगाणिस्तानात सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत गेल्या चोवीस तासात ३०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. त्याचवेळी १२५ हून अधिक जखमी झाले आहेत. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान नॅशनल सिक्युरिटी फोर्स (एएनएसएफ) ने नांगरहार, लगमन, गझनी, पक्तिका, कंदाहार, जाबूल, हेरत, जोजजान, समांगन, फरयाब, सर ए पोल, हेलमंद, निमरूज, बगलान आणि कपिसा प्रांतात जोरदार कारवाई केली. कंदाहारच्या परिसरात अफगाणिस्तानच्या हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात १६ तालिबानी दहशतवादी मारले गेले तर दहा जखमी झाले. हवाई दलाच्या विमानांनी काल बल्ख प्रांतात देहदादी जिल्ह्यात देखील कारवाई केली. या हल्ल्यात दहशतवाद्यांची ठिकाणं उद्ववस्त करण्यात आले. यासंदर्भात अफगाणिस्तानच्या मंत्रालयाने हवाई हल्ल्याचे दोन व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. बागलान प्रांतात सुरक्षा दलाने तालिबानचे २३ दहशतवादी मारले आणि त्यात चार जखमी झाले आहे. त्यांचा शस्त्रसाठाही नष्ट करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी जाबुल परिसरात हवाई दलाने अफगाणिस्तान सैनिकांच्या मदतीने ६० दहशतवादी ठार केले आणि यात ११ जण जखमी झाले.

२२३ जिल्ह्यांवर तालिबानचे वर्चस्व

लॉंग वॉर जर्नलच्या मते, अफगाणिस्तानच्या २२३ जिल्ह्यांवर तालिबानचे वर्चस्व आहे. त्याचवेळी ३४ प्रांतांच्या राजधानीपैकी १७ वर तालिबानचा थेट धोका आहे. संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानचा वरचष्मा होण्याचा धोका आहे. अर्थात अफगाणिस्तानचे सैनिक तालिबानशी दोन हात करत आहेत. त्याचवेळी अमेरिका आणि अन्य देशांनी देखील अफगाणिस्तानला मदतीसाठी हात पुढे केला आहे.

लश्‍करगा शहरात ९० दहशतवादी ठार

अफगाणिस्तान सुरक्षा दलाने लश्‍करगा येथे केलेल्या कारवाईत तालिबान आणि अल कायदाचे ९० हून अधिक दहशतवादी मारले गेले. तसेच १६ जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तान सैनिकांच्या अभियानात तालिबानचा हेलमंद प्रांतातील रेड युनिट कमांडर मावलावी मुबारक हा मारला गेला. मलावीसह ९४ तालिबानी, अल कायदाचे दहशतवादी ठार झाल्याचे मंत्रालयाने सांगितले.

सहा महिन्यात दीड हजार नागरिक मृत्युमुखी

अफगाणिस्तानात गेल्या सहा महिन्यांत १६५९ नागरिक ठार तर ३२५४ जण जखमी झाल्याचे सरकारी सूत्राने म्हटले आहे. मे महिन्यांत हिंसाचाराचे प्रमाण वाढले असून विशेषत: अफगाणिस्तानातून सैन्य माघारीची प्रक्रिया सुरु झाल्याने नागरी वस्तीवर हल्ले वाढले आहेत. अफगाणिस्तानच्या पूर्वोत्तर प्रांत तखरसह अनेक जिल्ह्यात ताबा मिळवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT